
दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार) :- सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील शिक्षण क्षेत्रात कायमचं नावारुपास असलेली,आणि संस्थापक अध्यक्ष आदरणीय जेष्ठ मार्गदर्शन ( शिक्षक). श्री हणमंत निरगुडे सर, यांनी विटा शहरात एक निरगुडे क्लासेसच्या नावाचे एक छोटेसे रोपटे लावले आणि ते रोपटे फुलून गेले, वृक्षवल्ली आम्हा सोयरे या वृक्षाचे रूपच बदलले, वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षांमध्ये यशाचे शिखर गाठले आणि नावलौकिक मिळविले असे नामांकित दिशा अकॅडमी याच दिशा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी प्रचंड यश संपादन केले आहे, शिक्षण क्षेत्राकडे लक्ष देत अकॅडमीचे नावचे उज्वल भविष्य घडवीत आपल्या स्वतःच्या नाव रूपात आणले ते विद्यार्थिनी अमृता रवींद्र गवळी हिने ४३२ गुण तर मथुरा अजय साळुंखे हिने ३३७ गुण प्राप्त करून अमृताने MHT_CET परिक्षेमध्ये ९२.९४%आणि मधुराने ९२.७९%गुण प्राप्त केले आहेत, त्यांच्या या यशाबद्दल शिक्षण क्षेत्रात तसेच निरगुडे क्लासेस व दिशा अकॅडमी व नातेवाईक कुटुंबातील सदस्य, मित्र मंडळी, शिक्षक. शिक्षेकेत्तर, कर्मचारी यांनी व विद्यार्थी विद्यार्थिनींनी या सर्वांकडून कौतुक व अभिनंदन करण्यात आले, अकॅडमी आणि क्लासेसच्या वतीने त्याचा या यशाबद्दल सत्कार करण्यात आला, दैनिक प्रीतीसंगमचे खानापूर विटा प्रतिनिधी शिराज शिकलगार यांनीही दिशा अकॅडमीचे व या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले,
