दर्पण न्यूज कोल्हापूर :-अनिल पाटील
कोल्हापूरातील प्रख्यात स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ज्ञ डॉ. सतीश पत्की यांचा वाढदिवस सोहळा उद्या, शनिवार दि. १८ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर हे प्रमुख उपस्थिती लावणार असून विविध क्षेत्रातील मान्यवर, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, हितचिंतक तसेच डॉ. पत्की यांचे असंख्य रुग्ण उपस्थित राहणार आहेत.
स्त्रीरोग व वंध्यत्व उपचार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत हजारो कुटुंबांच्या आयुष्यात आनंद फुलविणाऱ्या डॉ. सतीश पत्की यांच्या कार्याचा गौरव या निमित्ताने करण्यात येणार आहे. वैद्यकीय सेवेसोबतच सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी उभारलेले कार्य कोल्हापूर जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असल्याची भावना त्यांच्या सहकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
या वाढदिवस सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांचे निकटवर्तीय अनिल पाटील यांनी केले आहे.
