दर्पण न्यूज पलूस/भिलवडी : –
येथील सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये दिनांक 17 जुलै 2026 रोजी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींसाठी भव्य आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते श्री सद्गुरु दादा महाराज सांगवडेकर प्रतिष्ठान कोल्हापूर यांच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विद्यालयाचे मुख्याध्यापक आ. मोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम बाबासाहेब चितळे सभागृहात उत्साहात पार पडला या शिबिराला पाचवी ते दहावीच्या सुमारे 600 ते 700 विद्यार्थीनी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सौ .पी . व्ही . धेंडे मॅडम यांनी प्रास्ताविक करून व उपस्थिता चे स्वागत करून केली. यानंतर पाहुण्यांचा परिचय सौ. गावित मॅडम यांनी करून दिला . प्रतिष्ठानच्यावतीने राबवल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांची दिंडीतील डॉक्टरांची माहिती आयुर्वेदाचार्य डॉक्टर सुमित साळुंखे सर यांनी आपल्या भाषणात दिली. प्रतिष्ठानाची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉक्टर गौरी बोरकर यांनी विद्यार्थिनींना आरोग्य विषयी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. वाढत्या वयातील शारीरिक बदल आहार आणि वैयक्तिक स्वच्छता यावर त्यांनी प्रकाश टाकला. तसेच विद्यार्थिनींच्या मनातील विविध शंकांचे अत्यंत सोप्या भाषेत निरसन केले. त्याच्या सोबत त्यांचे सहकारी जानकर, ढोक, आमले उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका सौ. अनुराधा शिंदे मॅडम यांनी भूषवले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थिनींसाठी असा स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल सर्व डॉक्टर आणि प्रतिष्ठानची मनापासून आभार मानले व आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मयुरी पवार मॅडम यांनी केले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती विद्यालयाच्या प्रभारी पर्यवेक्षिका सौ. तांबोळी मॅडम व विद्यालयातील सर्व महिला शिक्षिका उपस्थित होत्या. तर उपस्थितांचे आभार सौ.वर्षा चौगुले मॅडम यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.
