दर्पण न्यूज भिलवडी ( मुख्य संपादक अभिजीत रांजणे):-
क्लेरमाँट इंटरनॅशनल स्कूल, आष्टा येथील १४ वर्षांखालील मुलांच्या कबड्डी संघाने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेच्या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
संघातील खेळाडूंनी शिस्त, जिद्द, सांघिक भावना आणि अथक परिश्रम यांच्या बळावर ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली. खेळाडूंना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्यातील कौशल्य विकसित करणाऱ्या प्रशिक्षकांचेही यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.
या यशाबद्दल संस्थापक अध्यक्ष श्री. राजेश चौगुले यांनी संघाचे व प्रशिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करत सांगितले की, “जिल्हास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवणे ही आपल्या शाळेसाठी अभिमानाची बाब आहे. विद्यार्थ्यांची मेहनत, शिस्त आणि सांघिक भावना यामुळे हे यश शक्य झाले आहे. भविष्यातही अशाच जोमाने खेळून राज्य व राष्ट्रीय स्तरावर क्लेरमाँट इंटरनॅशनल स्कूलचे नाव उज्ज्वल करावे,” अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट परंपरेत आणखी एका मानाच्या तुऱ्याची भर पडली. या यशाबद्दल शाळेचे संस्थापक मा. राजेश चौगुले, सचिव सौ. शितल चौगुले, उपाध्यक्ष श्री दत्तात्रय सोकाशी, संचालिका सौ. दिपा सोकाशी, व्यवस्थापक श्री. विकास सूर्यवंशी, शाळेचे प्राचार्य चंदनगौडा माळीपाटील, अकॅडमीक हेड सुनीता पंडिता, काॅर्डीनेटर निकिता रावल, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांनी विजेत्या खेळाडूंचे कौतुक व अभिनंदन केले.
