

दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार): —*विद्यार्थ्यांचा मन, मनगट आणि मेंदू बळकट असेल तर , शहराचा, तालुक्याचा ,पर्यायाने राष्ट्राचा विकास होऊ शकतो, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी साहेबांच्या या भावनिकशिस्त, व्यायाम आणि अभ्यास या त्रिसूत्रीचा वापर करून आपली प्रगती करावी, असे उद्गार श्री गंगाधर आप्पा लकडे यांनी व्यक्त केले.
*लोकनेते हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा, संचलित आदर्श माध्यमिक विद्यामंदिर, भवानीनगर, विटा येथे लोकनेते . हणमंतरावजी पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते…त्याचप्रमाणे विद्यालयाचे सन्मा.मुख्याध्यापक श्री धनवडे एस्. एम्. हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*या कार्यक्रमाची सुरुवात लोकनेते हणमंतरावजी पाटील यांच्या प्रतिमापूजनाने झाली. यानंतर विद्यालयाचे सन्मा. मुख्याध्यापक श्री धनवडे एस्. एम्. सर यांनी आपले प्रास्ताविक केले.त्यातून त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे स्वरूप , पार्श्वभूमी स्पष्ट केली. तसेच प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा परिचय सर्वांना करून दिला.
*या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांनी लो. मा. हणमंतरावजी पाटील , विटा नगरीचे माजी आमदार अँड . सदाशिवरावभाऊ पाटील , तसेच विटा नगरीचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट ऐ. वैभव दादापाटील या तीनही पिढ्यांसोबत अतिशय निष्ठेने प्रामाणिकपणे , समाजकार्य केले आहे , असे श्री गंगाधरजी आप्पा लकडेसाहेब हे उपस्थित होते…तरुणाचा मन, मनगट आणि मेंदू बळकट असेल तर , शहराचा तालुक्याचा ,पर्यायाने राष्ट्राचा विकास होऊ शकतो, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी साहेबांच्या या भावनिकशिस्त, व्यायाम आणि अभ्यास या त्रिसूत्रीचा वापर करून आपली प्रगती करावी, असे उद्गार श्री गंगाधरजी आपल्याकडे साहेब यांनी काढले. त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांनी आपली प्रकृती निकोप ठेवावी, निसर्गाच्या सानिध्यात रहावे, अभ्यासासोबतच व्यायामाकडे लक्ष द्यावे… विटा नगरीचे माजी आमदार ऍडव्होकेट श्री सदाशिवराव पाटील यांनी आपणांसाठी शिक्षणाची सुविधा निर्माण करून दिली आहे. आदर्श शैक्षणिक संकुलातील विविध शाखातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, शेकडो कर्मचाऱ्यांना नोकरी मिळाली आहे, त्याची जाणीव सर्वांनी ठेवावी, असे सांगितले… आदरणीय भाऊंच्याकडून शिक्षणाचा गर्व करु नये,, लोकांचे हित जोपासावे ,त्याग, सहनशीलता हे गुण घ्यावेत, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
*लो. मा. साहेबांच्या जयंती निमित्त विद्यालयांमध्ये गेले आठवडाभरापासूनच विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये निबंधलेखन स्पर्धा ,वक्तृत्व स्पर्धा ,प्रश्नमंजुषा स्पर्धा , विद्यार्थी हस्तलिखित असे आयोजन करण्यात आले ….आज प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या स्पर्धातील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीसाचे वितरण व अभिनंदन करण्यात आले. आदरणीय सदाशिवरावभाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले.
सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका सौ. निंबाळकर जे.एस्. यांनी केले तर सहाय्यक शिक्षिका आभार सौ.जाधव ए.व्ही .यांनी मानले.
