दर्पण न्यूज सांगली : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील बिगर व अंशत: अनुसूचित क्षेत्रातील सन 2024 व 2025 मध्ये मुदत संपलेल्या व सन 2026 या कालावधीत मुदत संपणाऱ्या नवनिर्मित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी संगणक प्रणालीव्दारे मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजन करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यासाठी मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक 15 एप्रिल 2026 असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिली.
या कार्यक्रमानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी शुक्रवार, दिनांक 24 जुलै 2026 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी शुक्रवार, दिनांक 24 जुलै 2026 ते बुधवार, दि. 29 जुलै 2026 पर्यंत आहे. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी मंगळवार, दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
