दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार) -:सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरात विटा येथे हरेकृष्ण सत्संग यांच्या वतीने श्री जगन्नाथ रथयात्रा संपन्न झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या रथयात्रेस प्रारंभ झाला. ही यात्रा विटा शहरातील कराड रोड. ब्राह्मण गल्ली. चिंचबंदर चौक. क्रांतिसिंह नाना पाटील कॉर्नर. मायणी रोड. वनविभाग कॉर्नर. या मार्गावरून तसेच मॉडर्न शाळा या मार्गावरून जगन्नाथ रथयात्रा मार्गस्थ झाली. हरे रामा हरे कृष्णा या नामाचा जाप करीत महिला व पुरुष भक्तांनी भक्तिभावाने रथयात्राला मोठा प्रतिसाद दिला. खानापूर आटपाडी चे आमदार सुहास बाबर यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन या रथाचे भक्ती भवानी दर्शन घेऊन पूजन केले तसेच या रथाचा दोर देखील ओढला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात आरतीमध्ये आमदार यांचा सहभाग दिसून आला.
यावेळी विटा शहरातील नागरिकांनी या रथाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. रथाचा दोरखंड वाढणे. रथापुढे झाडू मारणे. हे धार्मिक पवित्र मानले जात होते. धार्मिक विधीप्रमाणे हा सर्व कार्यक्रम पार पडला. विटा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ काजल म्हेत्रे यांनीही दोरखंड वरून झाडू मारून प्रभू श्री हरे रामा हरे कृष्णा म्हणत प्रभूंचे दर्शन घेतले. यावेळी संस्थेचे मुख्य दीनानाथ प्रभुदास यांनी दैनिक प्रीतीसंगमशी बोलताना सांगितले की हा उत्सव विटा येथील हरे कृष्ण सत्संग यांच्या वतीने घेतला जाता आहे. मागील बारा वर्षापासून नियमित सत्संग विटा येथे घेतला जातो. भागवती ग्रंथावर सर्वांना मार्गदर्शन केले जाते. विटा मधील जो भक्तगण आहे त्याच्यामार्फत हा जगन्नाथ रथयात्रा कार्यक्रम साजरा केला जात आहे. याचा मुख्य कार्यक्रम जगन्नाथ पुरी ओडिसा येथे साजरा केला जातो. व त्याचे प्रतीक म्हणून विटा शहरात रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे आम्ही सर्व भक्तगणांना आवाहन केले होते की या रथाचा दोर ओढून सर्वांनी परमेश्वराच्या कृपेचा लाभ घ्यावा व सत्संगच्या वतीने रोज पाहते अध्यात्माचे कार्यक्रम घेतले जातात. त्यामध्ये रोज पहाटे मंगल आरती. जपा. मेडिटेशन. तसेच शनिवारी साप्ताहिक सत्संग घेतला जातो. मंगळवारी भगवद्गीतेवर आधारित अभ्यासक्रम घेतला जातो. काल सायंकाळी भजनाचा कार्यक्रम होऊन भक्तांगणांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. हा सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या सत्संगचे अध्यक्ष कांतीलाल जोगड. राहुल पलूसकर. राहुल तारळे कर. दशरथ यादव. यांनी विशेष परिश्रम घेतले आहे. यावेळी महिलांचा व भक्तजन भाविकांचा मोठा प्रतिसाद दिसून आला.
