


दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार) -: विटा येथील रोशन ए आलम शिक्षण संस्था संचलित राहमत अंँगलो उर्दू हायस्कूल मध्ये इयत्ता आठवीच्या नूतन विद्यार्थिनींचा शालेय गणवेश वाटप सोहळा झाला.
या कार्यक्रमाची सुरुवात राहमत अंँगलो उर्दू हायस्कूल चे *मुख्याध्यापक माननीय श्री मोमीन खलील अहमद* यांच्या प्रस्ताविकेने झाली आपल्या प्रस्ताविकी भाषणामध्ये श्री मोमीन सरांनी इयत्ता आठवी मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा विशेष गौरव करून त्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय *श्री शिराज भाई शिकलगार* विटा शहराचे जेष्ठ पत्रकार यांच्या हस्ते विद्यार्थीनींना शालेय गणवेश देण्यात आला.
यावेळी त्यांचे मित्र *श्री गायकवाड साहेब* यांच्या हस्ते सुद्धा मुलींना शालेय गणवेश देण्यात आली यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री शिराज भाई शिकलगार यांनी नूतन विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात *संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री आलमगीर हाजी रोशन मुल्ला* साहेबांनी विद्यार्थी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन त्यांना योग्य मार्गदर्शन केले. यावेळी राहमत अंँगलो उर्दू हायस्कूलचे सौ मोमीन मॅडम कुमारी नया घर मॅडम श्री सत्तार सर श्री आंबी सर श्री गुफरान पटेल श्री मुजम्मिल पटेल उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता मुल्ला सरांच्या आभार प्रदर्शनाने झाली.