
दर्पण न्यूज मुंबई, प्रतिनिधी :
पांचपीर ट्रस्ट कार्यक्षेत्र भारत यांच्या वतीने आयोजित सार्थक साहित्य प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या कवी अशोक भवार यांच्या ‘काव्यमुदिता’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक व विचारवंत नवनाथ रणखांबे होते. यावेळी सार्थक साहित्य प्रकाशनाच्या संचालिका प्रा. आशा नवनाथ रणखांबे, पांचपीर ट्रस्टचे संचालक तथा साहित्यिक शाम परशुराम बैसाणे आणि बौद्ध विकास मंडळ पवईचे अध्यक्ष भाऊ पंडागळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आणि मानवतावादी निमंत्रित कवी संमेलन ज्येष्ठ कवी बबन सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रमणी बुद्धविहार, आयआयटी मेनगेट, पवई येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
यावेळी प्रकाशिका प्रा. आशा रणखांबे यावेळी बोलताना म्हणाल्या, “लेखकाच्या विचारांना दर्जेदार पुस्तकाचे रूप देणे ही सार्थक साहित्य प्रकाशनाची बांधिलकी आहे. ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर कार्य करत आम्ही साहित्यिकांना गुणवत्तापूर्ण प्रकाशनाची संधी उपलब्ध करून देत आहोत. त्यामुळे नवोदित आणि ज्येष्ठ साहित्यिकांनी याचा लाभ घ्यावा.” तर शाम बैसाणे यावेळी बोलताना म्हणाले, “पांचपीर ट्रस्टमार्फत नवोदित आणि ज्येष्ठ कवींच्या पुस्तक प्रकाशनास आम्ही मदत करत असून साहित्यिकांना विचारमंच उपलब्ध करून देत आहोत त्याचा लाभ घ्यावा.”
पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर आयोजित मानवतावादी निमंत्रित कवी संमेलन जेष्ठ कवी बबन सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी मानवतावादी काव्यमंच्यावर नवनाथ रणखांबे, शाम बैसाणे, अशोक भवार, संतोष नरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्ष आणि प्रमुख मान्यवरांसह अनंत धनसरे, धनंजय सरोदे, संदेश कर्डक, के. पुरुषोत्तम, प्रतीक कांबळे, सुरेखा गायकवाड, डॉ. सुशील बैसाणे, विकास भंडारे, वसंत हिरे, बाळासाहेब जोंधळे, वसंत वाघमारे, सुरेश घोडगे, जयलाभ धन पैठने, विश्वास कांबळे, महेश सावंत आदी. कवींनी आपल्या कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सुरेखा गायकवाड यांनी