दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :-
दि २१/०६/२०२६ रोजी पोस्टे येरमाळा हददीत सोलापूर धुळे महामार्गावरून जाणा-या आयशर टेम्पोवर चढून ताडपत्री फाडून आतील साहित्य चोरीला गेल्याचा प्रकार घडला होता, सदरबाबत पोस्टे येरमाळा गुरनं २४७/२६ क ३०३(२) भान्यासं अन्वये चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदरचा गुन्हा अतिसंवेदनशील व गंभीर स्वरूपाचे असल्याने मा. श्रीमती रितू खोखर, पोलीस अधिक्षक, धाराशिव यांनी असे गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोनि विनोद इज्जपवार यांना आदेशित केले होते.
दि २२.०६.२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक यांनी गोपनीय बातमीदार यांचेकडून | प्राप्त माहितीवरून आरोपी नामे संतोष राजेंद्र शिंदे वय २२ वर्षे रा लक्ष्मी पारधी पेढी, तेरखेडा यास शिताफीने ताब्यात | घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता त्याने त्याचे अन्य साथीदारांचे सोबत मिळून सदरची चोरी | केली असल्याचे कबूल केले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून चोरीस गेलेला मुददेमाल ओकस्मिथ व्हिस्कीचे ०९ बाक्स असा एकूण ०१,२३,३९२ रूपयांचा मुददेमाल पंचनामा करून ताब्यात घेण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींस जप्त मुददेमालासह पुढील कारवाईस्तव पोस्टे येरमाळा यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. श्रीमती रितू खोखर, पोलीस अधिक्षक धाराशिव व मा. श्री सचिन पांडकर, अपर पोलीस अधिक्षक धाराशिव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि श्री विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, सपोनि अमोल मोरे, पोह शौकत पठाण, पोह प्रकाश औताडे, पोह जावेद काझी, पोह प्रदीप वाघमारे पोह फरहान पठाण, मपोह शोभा बांगर, चापोह रत्नदिप डोंगरे, नागनाथ गुरव, रोहीत दंडनाईक यांचे पथकाने केली आहे.