दर्पण न्यूज पलूस भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे 28 मे 2026 रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
जेष्ठ नागरिक संघटना भिलवडीचे कार्यवाह व वाचन कट्टा समूहाचे अभ्यासू सदस्य श्री हनुमंतराव शिंदे यांचे हस्ते सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी श्री शिंदे यांनी सावरकरांच्या सामाजिक साहित्यिक कार्याचा आढावा घेतला. कार्यवाह सुभाष कवडे यांनी स्वागत प्रास्ताविक केले. ग्रंथपाल मयुरी नलवडे यांनी आभार मानले. यावेळी वाचक बहुसंख्येने उपस्थित होते.