

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :-
धाराशिव, दि. १२ जुलै : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, जिल्हा धाराशिव यांच्या वतीने मंगळवार, दि. २८ जुलै २०२६ रोजी धाराशिव येथे भव्य संविधान बचाव मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
या मोर्चाला सरसेनानी मा. आनंदराज आंबेडकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून कार्यकर्ते व जनतेला संबोधित करणार आहेत. तसेच मा. बबनराव घोलप, मा. दादासाहेब शेळके, मा. रुक्मिणीताई लोंढे, मा. राजू थाटे, श्री. आशिष वाकोडे आणि श्री. सिद्धार्थ शिनगारे हे मान्यवरही उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करून संविधानाने बहाल केलेल्या घटनात्मक हक्कांवर गदा आणण्याच्या प्रयत्नांविरोधात हा संविधान बचाव मोर्चा आयोजित करण्यात आला असून, संविधान, सामाजिक न्याय आणि आरक्षणाच्या संरक्षणासाठी व्यापक जनजागृती करण्याचा समितीचा निर्धार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, जिल्हा धाराशिव यांच्या वतीने जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी, सामाजिक, पुरोगामी संघटना, विद्यार्थी, महिला, युवक तसेच संविधानप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अशी माहिती व आवाहन आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, जिल्हा धाराशिव यांच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.