
*भिलवडी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात* *रंगला प्रा.डॉ.एच्.सी.* *वर्मा यांचा कृतीयुक्त व्याख्यानाचा* *कार्यक्रम*
दर्पण न्यूज पलूस भिलवडी :- भिलवडी मधील सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये भौतिकशास्त्र विषयातील तज्ञ, आय आय टी कानपूर मधील प्रा. डॉक्टर एच्. सी. वर्मा यांचा मार्गदर्शनपर व्याख्यानाचा कार्यक्रम SSB IAPT भिलवडी यांच्या सहकार्यातून संपन्न झाला. सकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांना एच् सी वर्मा यांनी मार्गदर्शन केले. सायन्स सारखा विषय कसा कृतीयुक्त अध्यापनातून शिकावा हे अनेक प्रयोगातून त्यांनी सांगितले.
या सत्रांमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे सर्व विद्यार्थी तसेच इंग्लिश मीडियम स्कूलचे व काही बाहेरील कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुसऱ्या सत्रात प्रा. डॉक्टर एच्. सी. वर्मा यांचे संस्थेच्या सर्व विभागातील शिक्षक व भिलवडी गावातील तसेच परिसरातील मान्यवर यांना मार्गदर्शन पर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व इलेक्ट्रिक ज्ञानज्योती चे प्रज्वलन करून झाले. प्रा. डॉक्टर एच्. सी. वर्मा यांनी आपल्या दीड तासाच्या मार्गदर्शनपर भाषणात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कसे शैक्षणिक दृष्ट्या पारंगत करावे हे सांगितले. उपस्थिताशी संवाद साधत त्यांनी अनोख्या पद्धतीने मार्गदर्शन केले. डॉक्टर व इंजिनियर्स पेक्षा समाजाला चांगल्या शिक्षकांची गरज आहे हे आवर्जून सांगितले. विद्यार्थ्यांना आव्हाने स्वीकारण्यास तयार करा ,अभ्यासाची शॉर्टकट पद्धत चुकीची असून कृतीयुक्त अध्यापनावर भर द्यावा याचे सल्ले दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक माननीय श्री मुकुंद जोग सर होते. त्यांनी अध्यक्षीय मनोगतांमध्ये वर्मा सरांनी जे चैतन्य आपल्याला दिले आहे त्याच्या जोरावर शैक्षणिक वाटचाल करूया हे सांगितले. विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री एस् एस् मोरे सरांनी आपल्या विद्यालयाला प्रा. वर्मा सरांनी भेट देणे हा दिवसच भाग्यशाली आहे. यांच्या दौऱ्याचे सुनियोजन प्रा. डॉ. जी. बी. पाटील सरांनी केले याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. आनंददायी शिक्षण कसे देऊ शकतो हे वर्मा सरांच्या कडून आपण शिकलो असे मत मांडले.
दोन्ही सत्रातील कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे सहसचिव श्री के. डी. पाटील सर व प्रा. जी.बी. पाटील सर यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचे ओळख उपमुख्याध्यापिका सौ. शिंदे मॅडम यांनी करून दिली. आभाराची औपचारिकता प्रा. एम्. एस्. पुजारी सर यांनी पूर्ण केली.दोन्ही कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ.भाग्यश्री सुर्यवंशी मँडम यांनी केले.
या संपूर्ण कार्यक्रमांमध्ये संस्थेचे सर्व विभागाचे शिक्षक, परिसरातील मान्यवर ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.