
दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार):- सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघ व सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग यांचे संयुक्त वतीने दिनांक 15 जुलै रोजी विविध विषयावर मार्गदर्शनपर संयुक्त सभेचे आयोजन, शांतिनिकेतन परिसर सांगली येथे आयोजित करण्यात आलेले आहे .
या संयुक्त मुख्याध्यापक सहविचार सभेचे उद्घाटन, पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार मा. जयंतजी आसगांवकर यांचे उपस्थितीत होणार असून, माध्यमिक शिक्षण विभागाचे प्रभारी शिक्षणाधिकारी मा. विशाल दशवंत, मुख्याध्यापकांना *माध्यमिक शाळांचे वार्षिक नियोजन व महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन* करणार आहेत . सकाळच्या सत्रामध्ये भविष्य निर्वाह निधी व वेतन पथक सांगलीचे अधीक्षक,मा.आबासाहेब लावंड मार्गदर्शन उपस्थित राहून असून मार्गदर्शन करणार आहेत . दुपारच्या सत्रात लेखापरीक्षण कार्यालय (माध्यमिक शिक्षण ) सांगलीचे लेखाधिकारी मा. रविराज शिंदे साहेब,*शाळांचे लेखापरीक्षण* याबाबत माहिती देतील . सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघाचा मागील वर्षाचा वार्षिक कामकाजाचा आढावा,मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजयकुमार झांबरे सर देतील, यानंतर संत सोपान काका फाउंडेशन सासवड, जिल्हा पुणे यांच्या वतीने, *सुंदर माझी शाळा* या अभियानातील तालुकास्तरीय विजेत्या शाळांचे बक्षीस वितरण कार्यक्रम, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापकाचे सचिव,राष्ट्रपती पुरस्कार विजेते मा.नंदकुमार सागर यांच्या उपस्थितीत होणार आहे .
दोन सत्रांच्या दरम्यान उपस्थित मुख्याध्यापकांना स्नेह भोजन आयोजित केले असून,दिवसभराच्या या सहविचार सभेमध्ये मुख्याध्यापकांना वार्षिक कामाचे नियोजन, वेतन पथक कार्यालय, लेखाधिकारी कार्यालय यांचे कडून महत्त्वाची माहिती मिळणार आहे .जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा (सर्व माध्यमाच्या) स्वयं अर्थसाहित कनिष्ठ महाविद्यालयाने च्या सर्व मुख्याध्यापकांनी उपस्थित राहणे बाबतचे आवाहन, सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने,सचिव,श्री संतोष नाईक यांनी केले आहे .