दर्पण न्यूज मिरज सांगली :-भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त व माता रमाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त सांगली जिल्हा काँग्रेस शहर जिल्हा काँग्रेस व काँग्रेस सेवा दलाच्या वतीने काँग्रेस भवन सांगली येथे संयुक्त अभिवादन करण्यात आले प्रारंभी राजेश नाईक व ओबीसी चे तुकाराम माळी यांचे हस्ते माता पंडित नेहरू व माता रमाईयांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी बोलताना राजेश नाईक यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली पंडित नेहरू सरदार वल्लभाई पटेल मौलाना आझाद अशा महान नेत्यांनी कार्य केले पंडित नेहरू यांनी या भारताचे पंतप्रधानपद सोळा वर्षे भूषविले त्यांच्या कारकिर्दीमध्ये कित्येक संस्था कित्येक धरणे यांची निर्मिती करून देशाला अन्नधान्यांमध्ये स्वयंपूर्ण करण्याचे काम केले त्यांनी संसदीय लोकशाही धर्मनिरपेक्षता व विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रसार केला त्यामुळे आधुनिक राष्ट्र म्हणून भारताची प्रतिमा आज जगापुढे राहिले आहे माता रमाई यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जीवनामध्ये संयमाने साथ दिली अशा या थोर पंडित नेहरू व माता रमाई यांना सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने मी अभिवादन करतो स्वागत व प्रास्ताविक सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी केले व शेवटी आभार विठ्ठलराव काळे यांनी मांनले यानंतर सर्वांनी जुना स्टेशन चौक येतील पंडित नेहरू यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी ओबीसी सेलचे तुकाराम माळी राजीव गांधी पंचायत राज जिल्हाध्यक्ष देशभूषण पाटील विधानसभा क्षेत्र अध्यक्ष आदिनाथ मगदूम सेवा दलाचे माजी अध्यक्ष अनिल सुगणनावरयांनीही आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी समीना मुल्ला मीनाक्षी सुतार मीना शिंदे शमशाद नायकोडी नामदेव पठाडे सुरेश पाटील सिद्रा या गणाचार्य सचिन पाटील मुजू पटवेकर उस्मान मगदूमआप्पा पाटणकर मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते