दर्पण न्यूज सांगली : राज्याचे गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश ज्योती रामदास कदम हे शुक्रवार, दि. 10 एप्रिल 2026 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दि. 10 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी येथील विविध विकासकामांचे भूमीपूजन. सकाळी 9.45 वाजता पंचायत समिती आटपाडी येथे भेट. सकाळी 10.15 वाजता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानास उपस्थिती, स्थळ – जवळे हॉल, ता. आटपाडी. सकाळी 11 वाजता जवळे हॉल येथून विश्वचंद्रा हॉल भिवघाट, विटाकडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानास उपस्थिती, स्थळ – विश्वचंद्रा हॉल भिवघाट, ता. खानापूर. दुपारी 2 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण व अन्न व औषध प्रशासन विभागांची विविध विषयांवर आढावा बैठक, स्थळ – खानापूर पंचायत समिती सभागृह विटा. सायंकाळी 4 वाजता खानापूर पंचायत समिती सभागृह विटा येथून जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय सांगलीकडे प्रयाण. सायंकाळी 5 वाजता महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण व अन्न व औषध प्रशासन विभागांची विविध विषयांवर आढावा बैठक, स्थळ – जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली. सायंकाळी 7 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथून शासकीय विश्रामगृह सांगलीकडे प्रयाण. रात्री 7.10 वाजता शासकीय विश्रामगृह सांगली येथे आगमन व मुक्काम.