दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी( शिराज शिकलगार):– सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कलचे माजी आमदार ॲड सदाशिवराव (भाऊ) पाटील यांचे सुपुत्र आणि विटा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष भाजपचे युवा नेते ॲड, श्री वैभव ( दादा) पाटील हे प्रत्येक रविवारी नेहमीप्रमाणे विटा शहराचे दैवत श्री नाथ बाबांच्या दर्शनासाठी नेहमीच जात असतात, नेहमीप्रमाणे विटा शहरातील जुना गाव भाग रोड मुस्लिम समाज बांधव येथील मस्जिद जवळ वैभव दादांची गाडी आली, दादा गाडीतून खाली उतरले आणि काही क्षणात त्याच परिसरात बालगोपाळ दादांची वाट बघत थांबले होते दादा आले की फ्रेंडशिप डे शुभेच्छा द्यायच्या आणि दादांना फ्रेंडशिप बांधायचं अशा विचाराने हे बालगोपाळ वैभव दादांची वाट बघत थांबले होते, दादा गाडीतून खाली उतरले आणि लहान बालगोपाळाकडे दादांचे लक्ष गेलं हातामध्ये फ्रेंडशिप चा धागा आणि दादांच्या चेहऱ्यावर हास्य मुलांचा आनंद बघून हे सर्व बालगोपाल दादांच्याकडे धावले आणि वैभव दादांच्या हातामध्ये त्यांनी पहिल्यांदा फ्रेंडशिप डे चा धागा बांधला आणि दादांच्या चरणी नतमस्तक झाले, दादांना शुभेच्छा दिल्या यावेळी येण्या-जाणाऱ्यांच्या नजरा वैभव दादांच्याकडे आणि त्या बालगोपाळाकडे लागले होते, काही क्षणात दादांनीच माझ्या या चिमुकल्या मित्रांना फ्रेंडशिप डे च्या खूप खूप शुभेच्छा म्हणत दादा म्हणाले नातं वयाचे… नसतं ते मनाचा असतं! असे म्हणत चला बाळांनो नात बाबांची दर्शन घेऊन या असे म्हणत अशाच निरागस प्रेमातून आणि विश्वासातून जुळलेली नाती हीच माझी खरी कमाई आहे! राजकारण पद प्रतिष्ठा या पलीकडे जाऊन लहान चिमुकल्या मित्रांनी दिलेली ही आपुलकी आणि प्रेमाची भेट माझ्यासाठी खास आहे, छोटासा होता, पण मनाला स्पर्शून जाणारा होता! असे म्हणत युवा नेते वैभव दादा पाटील यांनी या बालगोपाळांना शुभेच्छा देत बाळांना अभ्यासात लक्ष द्या आणि मोबाईल पासून दूर राहा आई-वडिलांच्या विचाराचे धारा जपा असे म्हणत, दादांनी श्री नाथबाबांचे दर्शन घेऊन पुढील कामासाठी रवाना झाले,
