आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रसामाजिक

विभागीय माहिती कार्यालयाच्या हिंद-दी-चादर निबंध व घोषवाक्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

दर्पण न्यूज कोल्हापूर : विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या विचार व कार्यावर आधारित निबंध व घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेला स्पर्धकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. विभागीय माहिती कार्यालयाकडे शेकडो प्रवेशिका प्राप्त झाल्या. विद्यार्थी व खुल्या गटामध्ये घेण्यात आलेल्या या निबंध व घोषवाक्य स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आज मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर एका शानदार वातावरणात विभागीय माहिती कार्यालयात पार पडला.

28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी नवी मुंबईतील खारघर येथे गुरु तेग बहादूर साहेब जी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमाचे महाराष्ट्र शासनाने आयोजन केले आहे. त्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये विभागीय माहिती कार्यालयाने उपसंचालक प्रवीण टाके यांच्या मार्गदर्शनाखाली निबंध व घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन केले होते. आज एका शानदार कार्यक्रमात मराठी भाषा अभ्यासक प्रा.डॉ. अरुण शिंदे, विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष पत्रकार समीर देशपांडे, उर्दू व इंग्रजी भाषा अभ्यासक इनायत अली शेख, उपसंचालक प्रवीण टाके आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.

निबंध स्पर्धेसाठी खुल्या व विद्यार्थी गटातून मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू भाषेमधून निबंध व घोषवाक्य स्पर्धेसाठी शेकडो प्रवेशिका प्राप्त झाल्या. या स्पर्धेतील दोन्ही गटातील विजेत्या स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे –

 निबंध स्पर्धा (शालेय गट) प्रथम क्रमांक : आरती सागर नाईक (ज्योतिर्लिंग विद्यामंदिर, वडणगे, निगवे दुमाला, कोल्हापूर) द्वितीय : चेतना राजेंद्र चव्हाण (शां.कृ,.पंत वालावलकर हायस्कूल, कोल्हापूर), तृतीय : आसिया इरफान बहादूर (अँग्लो उर्दू हायस्कुल, औरवाड, ता. शिरोळ) तर उत्तेजनार्थ क्रमांकासाठी अक्षरा जयकुमार पाटील (महात्मा गांधी विद्यालय, रुकडी), जसविरसिंग पवित्रसिंग दुधानी (भारती विद्यापीठ इंग्लिश मिडीयम स्कूल, कोल्हापूर), अक्षरा विभिषण यादव (अनंतराव देसाई विद्यालय, पट्टणकोडोली- कोल्हापूर) या विद्यार्थ्यांनी पारितो‍षिक मिळविले.

निबंध स्पर्धा (खुला गट)- प्रथम क्रमांक : दीपक सर्जेराव पाटील, कोल्हापूर,  द्वितीय : अक्षय अरुण नलावडे, कोल्हापूर, तृतीय सुनील नातू, बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग, तर उत्तेजनार्थ क्रमांकासाठी सत्यजित शरद शिंदे (मु. पो. सांगडेवाडी, ता. पलूस, जि. सांगली), वैष्णवी सुधाकर माळी ( मु. पो. कवलापूर, ता. मिरज, जि. सांगली), साहिल रघुनाथ कासार ( मु.पो.माणगाव कासारवाडा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग)  यांनी पारितो‍षिक मिळविले.

घोषवाक्य स्पर्धा (शालेय गट)  : प्रथम क्रमांक: रेहान रियाज बागवान (निवासी शाळा जत, जि. सांगली), द्वितीय : ईशा निलेश बळते (विद्यापीठ हायस्कूल, कोल्हापूर),  तृतीय : अनुष्का मोरे (एसजीयु विद्यापीठ, हातकणंगले) तर उत्तेजनार्थ क्रमांकासाठी पायल वाघ, (एम.एस. पटेल इंग्लिश मिडीयम हायस्कूल, कोल्हापूर),  सेजल सुनील परब (कलेश्वर विद्यामंदिर नेरुर, जि. सिंधुदुर्ग), शाहीद शेख (रमजान शेठ बालदार विद्यालय, शिरढोण) या विद्यार्थ्यांनी यश मिळवले.

घोषवाक्य स्पर्धा (खुला गट)- प्रथम क्रमांक : संजय  शामराव सौंदलगे, कोल्हापूर, द्वितीय :अनुराधा शरद व्हटकर, कोल्हापूर, तृतीय : डॉ.राधिका उदय पेंडसे यांनी तर  उत्तेजनार्थ क्रमांकासाठी मिनाज शरीफभाई बागवान, कोल्हापूर, उद्देश  सर्जेराव पाटील, पन्हाळा, कोल्हापूर व प्रदीप  राजाराम देवरुखकर, मु.पो. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग यांनी उत्तेजनार्थ पारितो‍षिक मिळवले.

यावेळी हिंद -दी -चादर श्री गुरुतेग बहादुर साहेब जी यांच्या शहिदी समागम कार्यक्रमाच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांच्या प्रसिद्धी विषयक उत्कृष्ट कामाबद्दल  सिंधुदुर्गचे जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, सहायक संचालक वृषाली पाटील, माहिती अधिकारी फारुक बागवान, तसेच लघुलेखक वृषाली कदम यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!