महाराष्ट्रसामाजिक

डॉ डी.वाय.पाटील पॉलीटेक्निकची बॅडमिंटनमध्ये विजेतेपदाची हॅट्ट्रिक

 

दर्पण न्यूज कोल्हापूर :अनिल पाटील

येथील डॉ डी.वाय.पाटील पॉलीटेक्निकच्या मुलांच्या संघाने पदविका विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपदाची हॅट्ट्रिक साधली. सावंतवाडी येथे झालेल्या या स्पर्धेत कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यातील अकरा संघ सहभागी झाले होते.
या विजयी संघात अथर्व शिंदे ,हेत छाभैय्या ,तनिष्क यादव ,मितेश पटेल ,मेहुल पटेल यांचा समावेश आहे.

डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते आणि विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए.के.गुप्ता, प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, उपप्राचार्य नितीन माळी , रजिस्ट्रार महेश रेणके जिमखाना विभागप्रमुख अक्षय करपे, प्रा. सुरज जाधव यांच्या उपस्थितीत या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

इंटर इंजिनीरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत या स्पर्धा झाल्या. डॉ डी. वाय. पाटील पॉलीटेक्निक संघाने शरद पॉलीटेक्निक, गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक रत्नागिरी आणि अंतिम सामन्यात संजय घोडावत पॉलीटेक्निक या संघावर विजय मिळवले. विजेता डी. वाय.पाटील संघ संजीवनी केबीपी पॉलीटेक्निक कोपरगाव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!