येडशी येथील जनता विद्यालयाच्या एन.एम.एम.एस. परीक्षेतील यशस्वी गुणवंतांचा गौरव

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुने)-:
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा (NMMS) परीक्षेत येडशीच्या जनता विद्यालयाने घवघवीत यश मिळवले असून परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव आज विद्यालयात करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य चंद्रकांत नलावडे होते. तर गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
परीक्षेस बसलेल्या एकूण 81 विद्यार्थ्यांपैकी 38 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना श्री एस.जी.वाघमारे, श्री एस.एन.नलवडे
श्रीमती बारकुल मॅडम व श्रीमती भोसले मॅडम यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी पालकांच्या वतीने श्री अशोक सोलवट यांनी शाळेचे कौतुक केले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे प्राचार्य चंद्रकांत नलावडे, उपप्राचार्य श्री कांबळे सर व पर्यवेक्षिका श्रीमती नाईकनवरे मॅडम यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नलावडे सर यांनी केले.याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांची उपस्थिती होती.



