महाराष्ट्रराजकीय

बेळंकीच्या ग्रामस्थांचा मतदानावरील बहिष्कार मागे ; तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ

         दर्पण न्यूज मिरज /सांगली : मिरज तालुक्यातील मौजे-बेळंकी येथील नागरिकांनी  बेळंकी ते विजयनगर रस्ता व  बेळंकी रस्ता पूर्णपणे खराब झाला असल्याने या रस्त्याचा जो पर्यंत निर्णय होत नाही तो पर्यंत मतदानावर बहिष्कार घालत असल्याबाबत दि.  26 जानेवारी 2026 रोजीच्या ग्रामसभेत सर्वानुमते ठरले असल्याचा अहवाल पोलीस निरीक्षक, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे यांनी सादर केला होता. या अनुषंगाने प्रशासनाने सर्व तक्रारदार नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्याशी बैठक घेऊन त्यांचे समाधान करण्यात आले. त्यानंतर मौजे बेळंकीच्या  ग्रामस्थांनी मतदानावरील बहिष्कार मागे घेतला असल्याी माहिती तहसिलदार मिरज तथा जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

            प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, याबाबत दि. 29 जानेवारी 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालय बेळंकी येथे सर्व तक्रारदार नागरिक व लोकप्रतिनिधी तसेच गट विकास अधिकारी, पंचायत समिती मिरज, उपअभियंता, इ व द, पंचायत समिती मिरज, पोलीस निरीक्षक, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे व संबंधित यंत्रणा यांची संयुक्त बैठक मिरज तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ, यांनी आयोजित केली. या बैठकीत संबंधित ग्रामसडक योजनेंतर्गत कार्यान्वित यंत्रणेस सूचना देऊन मौजे-बेळंकी गावचे नागरिक व लोकप्रतिनिधी यांचे समाधान करण्यात आले. तसेच मौजे-बेळंकी येथील सर्व नागरिकांना मतदान करणे हे एक राष्ट्रीय कर्तव्य असल्याबाबतची जाणीव करून देण्यात आली व  व याबाबत जनजागृती करण्यात आली.

00000

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!