महाराष्ट्रराजकीय

भिलवडी जि प, वसगडे पं स गणातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा : वसगडे ग्रामपंचायत सदस्या सुचित्रा पाटील

खंडोबाचीवाडी येथे काँग्रेस पक्षाचे उमेदवार यांचा घरोघरी प्रचार ; महिलांचा मोठा सहभाग

 

दर्पण न्यूज भिलवडी/पलूस (अभिजीत रांजणे) :-
भिलवडी जिल्हा परिषद आणि वसगडे पंचायत समिती गणातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा , असे आवाहन वसगडे ग्रामपंचायत सदस्या सुचित्रा पाटील यांनी मतदार बंधू भगिनी यांना केले आहे. खंडोबाचीवाडी येथे काँग्रेस पक्षाचे उमेदवार यांचा घरोघरी प्रचार सुरू होता. त्यावेळी पाटील बोलत होत्या.

वसगडे ग्रामपंचायत सदस्या सुचित्रा पाटील यांनी सांगितले की,
पलूस कडेगांव मतदार संघात माजी मंत्री कै पतंगराव कदम साहेबांनी विकास केला. अनेक कुटुंबांना आधार दिला आहे. कै पतंगराव कदम साहेबांचा आशीर्वाद आणि आदर्श घेऊन माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी पलूस कडेगांव मतदार संघाचा आणि भिलवडी, वसगडे गावाचा सर्वांगीण विकास केला आहे. यापुढेही आमदार डॉ विश्वजीत कदम यांची साथ मिळणार आहे. त्यामुळे आपण निस्वार्थीपणे त्यांना साथ देऊया. भिलवडी जिल्हा परिषद गटातून काँग्रेसकडून प्रतिक पाटील आणि वसगडे पंचायत समिती गणातून शोभा हजारे यांना उमेदवारी मिळाली आहे. आम्ही महिला मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी असतो. प्रतीक पाटील आणि शोभा हजारे या काँग्रेस पक्षाचे उमेदवार असून यांना दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा, असे आवाहनही मतदार बंधू भगिनी यांना सुचित्रा पाटील यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!