सार्वजनिक वाचनालय भिलवडीला पत्नीच्या स्मरणार्थ डी. आर. कदम यांच्याकडून दहा हजारांची देणगी

दर्पण न्यूज भिलवडी :-सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडीचे उपाध्यक्ष डी. आर कदम यांनी त्यांच्या पत्नी स्वर्गीय मंगल दत्तात्रेय कदम यांच्या स्मरणार्थ वाचनालयास दहा हजार रुपयांची देणगी दिली .त्यांच्या पत्नीचे निधन एक महिन्यापूर्वी झाले होते. या देणगीचा धनादेश वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे यांनी नुकताच स्वीकारला. कार्यवाह सुभाष कवडे यांनी स्वागत प्रास्ताविक करून या निधीचा विनियोग वाचनालयाच्या अभ्यासिकेसाठी करण्यात येईल, असे सांगितले. अध्यक्ष गिरीश चितळे यांनी डी आर कदम सर यांचे विशेष आभार मानले. जयंत केळकर यांनी आभार मानले.
यावेळी ग्रंथपाल मयुरी नलवडे ,प्रमुख लेखनिक विद्या निकम उपस्थित होत्या. डी आर कदम यांचे वाचनालयाला नेहमीच सहकार्य व मार्गदर्शन असते. त्यांचे चिरंजीव अनिरुद्ध कदम व डॉक्टर अशितोष कदम यांनी देखील ही देणगी देण्याबाबत कदम सर यांना सहमती दर्शविलेली होती. यावेळी वाचनालयाचे वतीने दिवंगत सौभाग्यवती मंगल दत्तात्रय कदम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.



