महाराष्ट्रराजकीय
सांगली येथे शिवसेनेच्या प्रचाराचा पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांच्या उपस्थितीत शुभारंभ
प्रभाग क्रमांक 17 मधून शिवसेनेचे बसवराज पाटील उर्फ सियाराम यांची उपस्थिती






दर्पण न्यूज मिरज सांगली :
सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीनिमित्त एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खानकाम आणि माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या उपस्थितीत झाला.यावेळी आमदार मा. सुहास बाबर भैय्या, गौरव नायकवडी,रावसाहेब घेवारे, जिल्हा प्रमुख बजरंग पाटील, जिल्हा प्रमुख संजय विभुते, महानगर प्रमुख मोहन वनखंडे , सह संघटक महेंद्र चंडाळे, अरुण खरमाटे सर व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
हा कार्यक्रम वार्ड क्रमांक 17 मध्ये झाला. त्यामुळे प्रभाग क्रमांक 17 चे उमेदवार बसवराज पाटील उर्फ सियाराम यांच्यासह आदी उमेदवारांची उपस्थिती होती.



