कृषी व व्यापारमहाराष्ट्रसामाजिक
मानसिंग को-ऑप. बँक लि., दुधोंडी शाखा कराडचा १४ वा वर्धापन दिन उत्साहात : दिग्गज मान्यवरांची उपस्थिती





दर्पण न्यूज कराड :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील मानसिंग को-ऑप. बँक लि., दुधोंडी शाखा – कराड यांच्या*
१४ व्या वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या सोहळ्यास कराड नगर परिषदचे नूतन नगराध्यक्ष मा. श्री. राजेंद्र यादव, माजी आमदार आनंदराव नाना पाटील, कराडच्या तहसीलदार सौ. कल्पना ढवळे, एस. जी. एम. कॉलेजचे प्राचार्य खिलारे सर, उपप्राचार्य नांगरे सर यांच्यासह कराडमधील विविध नामांकित संस्थांचे पदाधिकारी, ठेवीदार, खातेदार व बँकेचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मान्यवरांनी बँकेचे *संस्थापक मा. जे. के. बापू जाधव, चेअरमन सुधीर (भैया) जाधव, क्रांती कुमार जाधव, संपूर्ण कर्मचारीवर्ग यांना प्रत्यक्ष भेट देऊन शुभेच्छा दिल्या.



