महाराष्ट्रसामाजिक
अभय कुलकर्णी यांच्याकडून सार्वजनिक वाचनालय भिलवडीस पुस्तके भेट

दर्पण न्यूज पलूस भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी अभय बळवंत कुलकर्णी पुणे यांनी त्यांचे पिताजी स्वर्गीय बी ए कुलकर्णी सर यांच्या स्मरणार्थ सार्वजनिक वाचनालय भिलवडी या वाचनालयास आज आशय संपन्न वाचनीय पाच पुस्तके भेट दिलेली आहेत. स्वर्गीय बी. ए. कुलकर्णी सर भिलवडी शिक्षण संस्थेचे माजी अध्यापक आहेत.
ही पुस्तके भेट श्री व सौ प्रणव प्रमोद कुलकर्णी यांनी वाचनालयाकडे दिली. या ग्रंथ भेटीचा स्वीकार उद्योगपती अध्यक्ष गिरीश चितळे यांनी केला. यावेळी कार्यवाह सुभाष कवडे उपाध्यक्ष डी आर कदम सर जायंट्स अध्यक्ष महावीर चौगुले, नूतन अध्यक्ष बाहुबली चौगुले व जायंट्स सदस्य उपस्थित होते.



