महाराष्ट्रराजकीय

राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाने पलूस नगरपरिषदेवर विजय मिळवून जनतेचा विश्वास जिंकला : माजी सहकार मंत्री तथा डॉ विश्वजीत कदम

नगराध्यक्षपदी संजीवनीताई सुहास पुदाले यांचा विक्रमी मताधिक्यांनी विजय ; पलूस येथे जल्लोष, घोषणा , फटाक्यांची आतषबाजी अन् मिरवणूक

 

दर्पण न्यूज भिलवडी पलूस :- राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाने पलूस नगरपरिषद निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून जनतेचा विश्वास जिंकला. पंधरा नगरसेवकांच्या विजयासह नगराध्यक्षपदी संजीवनीताई सुहास पुदाले यांनी विक्रमी मताधिक्याने विजय संपादन केला आहे, अशी माहिती माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी दिली.

आमदार डॉ विश्वजीत कदम म्हणाले की,पलूस नगरपरिषद निवडणुकीचा
विजयोत्सव साजरा करीत लोकतीर्थ स्मारक स्थळी माजी सहकार मंत्री स्व.डॉ. पतंगराव कदम साहेबांना अभिवादन केले . तसेच विजयी उमेदवारांना व नवनिर्वाचित नगराध्यक्षा संजीवनीताई सुहास पुदाले यांना पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या. पलूस येथील आराध्य दैवत श्री. धोंडीराज महाराज व सर्व महापुरुषांना अभिवादन केले. पलूस नगरपरिषद निवडणुकीतील विजय म्हणजे पलूसकरांनी स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांच्या आदर्श मूल्यांवर आणि काँग्रेस पक्षावर दाखवलेले प्रेम आहे. पलूसकरांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊन दिला जाणार नाही. लोकाभिमुख आणि विकासाभिमुख कारभाराच्या जोरावर मपलूस नगरीचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध आहोत.

दरम्यान,पलूस नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या धडाकेबाज विजयानंतर विजयी नगरसेवक आणि काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आमदार डॉ विश्वजीत कदम, महेंद्र आप्पा लाड, सुहास पुदाले यांच्यासह अनेक मान्यवरांनी पलूस नगरीतून जल्लोष मिरवणूक काढली.
पलूस नगरीतून आमदार डॉ विश्वजीत कदम यांच्या जोरदार घोषणा दिल्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!