क्राईममहाराष्ट्र
कसबा वाळवे येथे अंगावर गरम आमटी पडल्याने महिला जखमी

दर्पण न्यूज कोल्हापूर : अनिल पाटील
गरम आमटी अंगावर पडून कसबा वाळवे तालुका राधानगरी येथील महिला भाजून जखमी झाली. सुशीला परशराम कांबळे वय 65 असे त्यांचे नाव आहे. ही घटना काल सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली.
सुशीला कांबळे या कोल्हापुरातील आपल्या मुलग्याकडे पंधरा दिवसापासून राहतात. मला कंटाळा आला आहे म्हणून मी कसबा वाळवे गावाकडे चार दिवस राहून येतो असे तिने आपल्या मुलग्याला सांगितले. काल गुरुवारी ती आपल्या राहत्या घरी जेवण करत असताना चक्कर आल्याने तिच्या अंगावर गरम आमटी पडल्याने ती भाजून जखमी झाली. तिला त्यांच्या नातेवाईकांनी गावातीलच एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आज तिला पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची नोंद सी पी आर पोलीस चौकीत झाली आहे.



