जागतिक एड्स दिनानिमित्त प्रभात फेरीस प्रतिसाद

दर्पण न्यूज मिरज/सांगली : जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित प्रभात फेरी, बाईक रॅलीस उदंड प्रतिसाद लाभला. पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालयाच्या प्रांगणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ व महानगरपालिकेच्या आरोग्याधिकारी डॉ. सुचेता पवार यांनी रॅलीस हिरवा झेंडा दाखवला.
यानिमित्त यावर्षीचे घोषवाक्य Overcoming disruption, transforming the AIDS response म्हणजे अडथळ्यांवर मात करू, एकजुटीने एचआयव्ही/एड्सला लढा देऊ, नवं परिवर्तन घडवू असे आहे. या पार्श्वभूमिवर आयोजित ही प्रभात फेरी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली, आंबेडकर रोड, एसटी स्टॅण्ड, शिवाजी मंडई, हरभट रोड, राजवाडा चौक मार्गे मार्गक्रमण करून पद्मभूषण वसंतदादा पाटील स्मारक (स्टेशन चौक) सांगली येथे रॅलीची सांगता झाली. डॉ. विक्रमसिंह कदम व डॉ. विजयकुमार वाघ यांनी बाईक रॅलीत सहभाग घेतला.
रॅली सांगता ठिकाणी गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज यांच्याकडून Flash Mob चे सादरीकरण करण्यात आले. यानंतर जिल्हा शल्य चिकिसक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी उपस्थितांना एड्स दिनाची शपथ देवून मनोगत व्यक्त केले. सदर रॅलीमध्ये चिंतामणराव व्यापार महाविद्यालय, गणपतराव आरवाडे कॉलेज, विलिंग्डन कॉलेज, पतंगराव कदम कॉलेज सांगलीवाडी, गुलाबराव पाटील महाविद्यालय मिरज, डॉ. बापूजी साळुंखे कॉलेज मिरज, कस्तुरबा वालचंद कॉलेज सांगली, पद्मभूषण वसंतदादा पाटील कॉलेज, कवठेमहांकाळ, लक्ष्मीप्रभा नर्सिंग कॉलेज सांगली, मदनभाऊ पाटील नर्सिंग कॉलेज, विष्णुअण्णा पाटील नर्सिंग स्कूल, देसाई स्कूल ऑफ नर्सिंग, अंबाबाई तालीम संस्था नर्सिंग कॉलेज, आत्मशांती नर्सिंग कॉलेज, विद्यासागर नर्सिंग स्कूल, भारती विद्यापीठ नर्सिंग स्कूल, विवेकानंद नर्सिंग स्कूल बामणोली इत्यादिंनी सहभाग नोंदवला.
या रॅलीसाठी वेश्या महिला एड्स निर्मूलन केंद्र सुंदरनगर, संग्राम संस्था सांगली, व्हॅम्प संस्था सांगली (FSW), व्हॅम्प संस्था मिरज (FSW), लिंक वर्कर स्किम बामणोली, आधार वेलफेअर सोसायटी (Migrant), विहान सांगली, विहान मिरज इत्यादि अशासकीय संस्थांचे सहकार्य लाभले. दिपक चव्हाण व अभिजीत मालगावे यांचे सहकार्य लाभले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांच्याहस्ते सर्व कॉलेज व सर्व अशासकीय संस्था यांचे पुष्पगुच्छ देवून आभार मानण्यात आले. रॅलीचे नियोजन जिल्हा कार्यक्रम अधिकारी विवेक सावंत, जिल्हा पर्यवेक्षक प्रमोद संकपाळ, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे कर्मचारी व सर्व आयसीटीसी कर्मचारी यांच्याकडून करण्यात आले.



