आमदार डॉ विश्वजीत कदम यांचा पलूस मध्ये प्रचाराचा धडाका


पलूसच्या राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. संजीवनी सुहास पुदाले तसेच प्रभाग क्र. ५ आणि ७ मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ मतदार बांधवांशी ठिकठिकाणी भेटीगाठी घेत संवाद साधला. नागरिकांच्या अडचणी, अपेक्षा आणि स्थानिक विकासाची गरज यांचा थेट आढावा घेत त्यांनी पुढील पाच वर्षांसाठी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आणि हात या चिन्हासमोरील बटन सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा, अंतर्गत रस्ते सुधारणा, उद्याने व नागरिकांसाठी आवश्यक सुविधा यामध्ये लक्षणीय कामे झाली आहेत. आगामी काळात शहराला अधिक आधुनिक, सुसज्ज व सर्वसमावेशक बनविण्याचा संकल्प आम्हा सर्वांचा आहे. महिलांसाठी सुरक्षित आणि सक्षम वातावरण, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा केंद्रे, तर युवा पिढीसाठी रोजगार, क्रीडा सुविधा आणि तंत्रज्ञानाधारित योजना राबवण्यावर आमचा भर राहील.



