महाराष्ट्रराजकीयसामाजिक
सांगली जिल्हा नगरपरिषद-नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 : प्रसारमाध्यमे समन्वय अधिकारीपदी डॉ. पवन म्हेत्रे

दर्पण न्यूज मिरज/सांगली : राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींमधील सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील उरूण-ईश्वरपूर, विटा, तासगाव, आष्टा, जत, पलूस नगरपरिषद तसेच शिराळा व आटपाडी नगरपंचायत अशा एकूण 8 नगरपरिषदा/नगरपंचायतींची प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेबाबत प्रसारमाध्यमे यांच्याकरिता संपर्क व समन्वय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपरिषद प्रशासन शाखेचे प्रभारी सहायक आयुक्त डॉ. पवन म्हेत्रे असून त्यांचा मोबाईल क्रमांक 9860010308 असा आहे, असे नगरपरिषद प्रशासन शाखेचे जिल्हा सह आयुक्त दत्तात्रय लांघी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.


