वसगडे ,नांद्रे, नावरसवाडी सांगली रस्ता तात्काळ दुरुस्त करा : अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार

दर्पण न्यूज भिलवडी/ पलूस:- सांगली जिल्ह्यातील वसगडे नांद्रे नावरसवाडी सांगली रस्ता तात्काळ दुरुस्त करा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी दिला आहे.
ते म्हणाले की, गेली दोन वर्षे झाली जुना सातारा रोड राज्यमार्ग क्रमांक 142 म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्ल्यूडी ने लावलेला मृत्यूचा सापळा पाचवा मैल वसगडे नांद्रे नवरसवाडी कर्नाळ या रस्त्याची दुरावस्था इतकी झालेली आहे की हा रस्ता म्हणजे पीडब्ल्यूडी ने साक्षात लावलेला मृत्यूचा सापळाच बनलेला आहे या रस्त्यावरून प्रवास करणारा प्रवासी संध्याकाळी सुस्थितीत अथवा जिवंत घरी पोहोचेल का नाही याची शाश्वती नाही याच रस्त्यावरती वसगडे ते जेवण हायस्कूल सुद्धा आहे हा रस्ता हजारवाडी येथील गॅस व पेट्रोल डिझेल प्लांट ला व चितळे डेअरीला तसेच किर्लोस्करवाडी कराड तासगाव पुसेसावळी कडे जाणाऱ्या वाहनांची प्रचंड गर्दी असते त्यातच उसाचा गाळप हंगाम सुरू झालेला असून क्रांती कारखाना सोनहिरा कारखाना दत्त इंडिया कारखाना रेठरे कारखाना दत्त शिरोळ पंचगंगा व वारणा तसेच वसंतदादा इंडिया कारखान्याची बैलगाडी तसेच ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व अंगद गाड्यांच्या वाहनांची गर्दी वाढलेली रस्त्यावरील असलेल्या खड्ड्यामुळे जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे गेल्या वर्षभरामध्ये गाडीवरून खड्डे चुकवण्याच्या नादात अनेक छोटे-मोठे अपघात झालेले आहेत त्यामध्ये गाडीवरून पडण्याचे महिलांचे प्रमाण अधिक आहे सार्वजनिक बांधकाम उपविभाग पलूस व सांगली विभागाला अनेकदा तोंडी सांगून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून थातूरमातूर उत्तरे दिली जातात परंतु रस्ता दुरुस्तीची कोणतीही कारवाई केली जात नाही सार्वजनिक विभागाने यावर कोणतीही ठोस पाऊल उचलले नाही तसेच या रस्त्यावर एखादा अपघात झाला तर सार्वजनिक बांधकाम विभागावरती सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावरील आंदोलनाबरोबरच सार्वजनिक उपविभाग पलूस व सांगली व मिरज यांच्या कार्यालयामध्ये जोपर्यंत रस्ता दुरुस्त होणार नाहीत तोपर्यंत ठिया आंदोलन करेल व होणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम उपविभाग पलूस उपविभाग सांगली व मिरज यांची राहील, अशी
संदीप राजोबा
मा पंचायत समिती सदस्य पलूस
जिल्हा कार्याध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी दिली आहे.


