टाकळीभानच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शालेय ग्रामसभा खेळीमेळीत संपन्न

दर्पण न्यूज टाकळीभान :- रयत शिक्षण संस्थेच्या टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व आण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शालेय ग्रामसभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली .यावेळी शालेय ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी टाकळीभानच्या विद्यमान सरपंच सौ .अर्चनाताई रणनवरे तर व्यासपीठावर रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बापूसाहेब पटारे ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नंदकुमार जाधव, विद्यालयाचे मुख्याध्यापक आर . एम . शिंदे, पर्यवेक्षक एस. एस . जरे आदी मान्यवर उपस्थित होते .
रयत शिक्षण संस्थेच्या ध्येयधोरणानुसार विद्यालयामध्ये सुरू असलेल्या नवनवीन उपक्रमांची पालक व ग्रामस्थांना माहिती व्हावी या दृष्टिकोनातून विद्यालयामध्ये शनिवार दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी शालेय ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते .शालेय ग्रामसभेच्या प्रारंभी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ .कर्मवीर भाऊराव पाटील व त्याग मूर्ती लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे सर्व मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले . यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर .एम . शिंदे यांनी विद्यालयाच्या प्रगतीचा लेखाजोखा प्रास्ताविकाच्या माध्यमातून मांडला . विद्यालयाच्या गुरुकुल विभाग प्रमुख श्रीमती एन . ए .पालवे यांनी विद्यालयात राबवत असलेल्या विविध उपक्रमांची पालक व ग्रामस्थांना माहिती दिली .यावेळी पालक प्रतिनिधी रामेश्वर आरगडे यांनी ज्युनिअर कॉलेजमध्ये विज्ञान शाखा सुरू करावी अशी मागणी केली . त्याचबरोबर पत्रकार बापूसाहेब नवले यांनी विद्यालयामध्ये शालेय ग्रामसभेचे आयोजन केल्याबद्दल विद्यालयाचे कौतुक करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावे असे आवाहन केले .यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बापूसाहेब पटारे यांनी विद्यालयात विज्ञान शाखा सुरू करण्या संदर्भात व शाखेच्या इमारत बांधकामासंदर्भात संस्थापातळीवर प्रयत्न केले जात असून सामाजिक बांधिलकी म्हणून ग्रामस्थांनी विद्यालयाला सहकार्य करावे असे आवाहन केले .यावेळी डॉ राम बोरुडे,सौ . छायाताई लांडगे ,बाबा सय्यद,सचिन भालसिंग, गणेश पवार, रामेश्वर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते . शालेय ग्रामसभेचे सूत्रसंचालन संदिप जावळे यांनी तर आभार एस . एस .जरे यांनी व्यक्त केले .


