कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय (सी.पी.आर) मध्ये बालरोगशास्त्र विभागात “बाल दिन” मोठ्या उत्साहात साजरा


कोल्हापूर, अनिल पाटील
१४ नोव्हेंबर रोजी देशभरात बालदिन साजरा होतो. हा दिवस पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर येथील बालरोगशास्त्र विभागाच्या अंतर्गत बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी लहान मुलांच्या चित्रकला स्पर्धा, चित्रांमध्ये कलर भरण्याच्या स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि जादूचे खेळ याचे आयोजन करण्यात आले होते.
बालरोगशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ.संगीता कुंभोजकर यांनी अधिष्ठाता त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यानंतर मा.अधिष्ठाता आणि उपस्थित सर्व मान्यवर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
बालरोगशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ.संगीता कुंभोजकर यांनी “बालकांचे आरोग्य आणि बालक आजारी पडू नये याकरिता घ्यावयाची काळजी” यावर उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले.
यावेळी लिव्हर ट्रान्सप्लांट झालेला रुग्ण कु.श्लोक काटकर यांच्या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी श्लोक काटकर याच्या पालकांनी “माझ्या बाळाचे प्राण वाचवण्यासाठी लहान मुलांचे लिव्हर तज्ञ डॉ.भूषण मिरजे यांनी खूप मदत केली असल्याचे सांगितले.
तसेच जी.बी.एस या आजारातून बरी झालेली रुग्ण कु.शरयू चव्हाण हीच्या नातेवाईकांनी बालरोगशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ.संगीता कुंभोजकर, सहयोगी प्राध्यापक डॉ.शिशिर मिरगुंडे, डॉ.भूषण मिरजे आणि डॉ.महेश्वरी जाधव तसेच विभागातील सर्व डॉक्टर्स यांचे आभार मानले.
यानंतर अधिष्ठता डॉ.सदानंद भिसे यांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.
यानंतर उपस्थित सर्व मान्यवर यांनी बालकांच्या समवेत केक कापला.
यावेळी अधिष्ठता डॉ.सदानंद भिसे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना “मुलांना प्रेम, सुरक्षा आणि योग्य वातावरण मिळायला हवे. मुलांचे हक्क, शिक्षण, पोषण, आरोग्य आणि सुरक्षितता याकडे सर्व पालकांनी लक्ष दिले पाहिजे” असे सांगितले आणि सर्व बालकांना
बालदिनाच्या शुभेच्छा शुभेच्छा दिल्या.
यानंतर उपस्थित सर्व बालकांना मान्यवरांच्या हस्ते खाऊचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास अधिष्ठता डॉ.सदानंद भिसे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.भूषण मिरजे, बालरोगशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ.संगीता कुंभोजकर, सहयोगी प्राध्यापक डॉ.शिशिर मिरगुंडे, वै अधिकारी डॉ.गिरीश कांबळे, सहायक प्राध्यापक डॉ.महेश्वरी जाधव, वरिष्ठ निवासी डॉ.निलेश कुंभार, डॉ.कविता देशमुख, डॉ.क्षितिज, डॉ.राघव, सर्व कनिष्ठ निवासी डॉक्टर, अधिसेविका सोनुर्ले मॅडम, शारदा मॅडम, नर्सिंग कॉलेजच्या उपप्राचार्य पल्लवी मॅडम, खांडेकर मॅडम, वाणी मॅडम तसेच विभागातील सिस्टर रूपाली, सरिता, अभीगेल, सानिया, डिसोजा, डोईफोडे समाजसेवा अधीक्षक श्री.अजित भास्कर सर्व बालरुग्ण आणि त्यांचे पालक, रुग्णालयाकडून सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आभार डॉ.भूषण मिरजे यांनी मानले आणि सूत्रसंचालन सौ.मीना डिसूजा सिस्टर यांनी केले.


