महाराष्ट्रसामाजिक
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे विमानतळावर जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्वागत

दर्पण न्यूज कोल्हापूर: माजी राष्ट्रपती माननीय रामनाथ कोविंद यांचे कोल्हापूर विमानतळावर जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. आणि जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी स्वागत केले.
यावेळी पद्मश्री डॉ.विकास महात्मे, संजय घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू उद्धव भोसले, विश्वस्त विनायक भोसले, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, विमानतळ संचालक अनिल शिंदे, राधानगरी प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, करवीर तहसीलदार स्वप्नील रावडे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्यांना कोल्हापूर जिल्हा पर्यटन पुस्तिका भेट दिली.


