छत्रपती शाहुंची मूर्ती ही करवीरची आठवण कायम सोबत राहील : विस्तार अधिकारी विजय नलवडे यांचे प्रतिपादन

दर्पण न्यूज कोल्हापूर : अनिल पाटील
करवीर पंचायत समिती व ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाच्या वतीने माझा रयतेचा राजा छत्रपती शाहू महाराज यांची मूर्ती देऊन केलेला सन्मान आणि निरोप समारंभ हीच प्रामाणिक कामाची पोच पावती आहे. ही करवीरची आठवण कायम माझ्या सोबत राहील. असे गौरउदगार करवीर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विजय नलवडे यांनी व्यक्त केले. कोल्हापूर जिल्हा परिषद सभागृहात आयोजित केलेल्या निरोप समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. करवीरचे सहाय्यक गटविकास अधिकारी सुहासराव पाटील, विस्तार अधिकारी संदेश भोईटे. यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी करवीरचे विस्तार अधिकारी (पंचायत )अमोल मुंडे यांची सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून अक्कलकोट पंचायत समिती या ठिकाणी तर करवीरचे विस्तार अधिकारी पंचायत विजय नलवडे. यांची सहाय्यक गटविकास अधिकारी शिराळा पंचायत समिती या ठिकाणी पदोन्नतीने नियुक्ती झाल्याबद्दल पंचायत समिती करवीर आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्या वतीने निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अमोल मुंडे व विजय नलवडे यांचा रयतेचा राजा छत्रपती शाहू महाराज यांची मूर्ती, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी विजय नलवडे आणि अमोल मुंडे यांच्या उत्कृष्ठ कार्याचा आढावा ग्रामपंचायत अधिकारी यांनी मनोगतातून व्यक्त करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास अभिजीत चौगुले, महेश खाडे, काका पाटील, अजित राणे,आर. के. पाटील,राजेंद्र गाढवे, संदीप पाटील, दत्तात्रय धनगर, पांडुरंग मेंगाणे, शिवाजी वाडकर सचिन शिरदवाडे गायत्री जाखलेकर, संगीता बोरगे, शिवाजी चौगले, आदीसह करवीर मधील सर्व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते. आभार संदीप पाटील यांनी मानले.


