बाचणी येथील न्यू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक अनिल रघुनाथ खामकर आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर, अनिल पाटील
*सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.मुंबई यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श मुख्याध्यापक, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी पुरस्काराचा वितरण सोहळा नुकताच महाकवी कालिदास नाट्य मंदिर इंदिरा गांधी क्रीडा संकुल मुलुंड मुंबई येथे संपन्न झाला.यावेळी बाचणी तालुका कागल येथील न्यू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक श्री अनिल रघुनाथ खामकर यांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले*
*यावेळी आरबीआय व नाबार्डचे संचालक श्री सतीश मराठे सेकंडरी स्कूलचे चेअरमन श्री चंद्रकांत पाटील मुलुंड मतदारसंघाचे आमदार मिहीर काटे विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारती आमदार विक्रांत पाटील पुरंदरचे माजी आमदार श्री संजय जगताप सेकंडरी सोसायटीचे सर्व संचालक मंडळ व श्री बी.डी. कांबळे उपस्थित होते*


