महाराष्ट्रराजकीयसामाजिक

मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघाची धाराशिव शाखेची बैठक संपन्न

 

धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुने )-:मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघाची धाराशिव शाखेची बैठक आज दिनांक 8 नोव्हेंबर 2025 रोजी धाराशिव येथे संपन्न झाली बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक राम चंदनशिवे हे होते 7 नोव्हेंबर 1900 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा झाला त्याबद्दल समाधान व आनंद व्यक्त करण्यात आला पण पुढील काळात डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन मोठ्या प्रमाणात शहरातील मोठ्या मैदानामध्ये सर्व शाळा, महाविद्यालयातील विद्यापीठातील विद्यार्थ्यांना सामावून घेऊन साजरा करण्यात यावा याबाबत संबंधितांना सुचित करावे अशी भूमिका सभासदांनी मांडली या आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सातारा येथील प्रतापसिंग हायस्कूल राजवाडा चौक सातारा येथे पहिल्या वर्गात प्रवेश घेतला होता शिक्षण, सत्ता, संपत्ती यापासून समाजास वंचित ठेवले होते पण वडिल रामजी बाबांनी दिलेल्या शिक्षण संस्कारामुळे कधीकाळी समाजाने बहिष्कृत केलेल्या समाजातील मूल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडक हे भारतीय संविधानाचे शिल्पकार ठरले हे केवळ आणि केवळ शिक्षणाचा परिणाम आहे म्हणून समाजातील मुलांनी नकारात्मक भूमिका सोडून शिक्षणाचा ध्यास घेतला पाहिजे बैठकीमध्ये सध्याच्या महाराष्ट्रातील सामाजिक प्रश्नांची चर्चा झाली शिक्षण व्यवस्था ,सामाजिक व्यवस्था, आर्थिक, व्यवस्था राजकीय व्यवस्था सांस्कृतिक व्यवस्था ामध्ये आपले स्थान काय आहे समाजामध्ये दररोज घडणाऱ्या घटनांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे समाजावर आणि आपल्यावर कसा परिणाम होतो ते सोडवण्यासाठी आपण सेवानिवृत्त कर्मचारी म्हणून सामाजिक ऋण फेडण्यासाठी समाजातील एक घटक म्हणून काय करू शकतो याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार आणि प्रसार करण्यासाठी आपण कटिबद्ध असले पाहिजे केवळ प्रतिक्रिया न देता प्रश्नांची उत्तरे शोधून त्यावर कार्यवाही केली पाहिजे अशी भूमिका बैठकीत विशद करण्यात आली आज आपण गप्प बसलो ,निष्क्रिय राहिलो, तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला कधीच माफ करणार नाहीत म्हणून मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सतत जागृत असले पाहिजे अशी भूमिका सभासदांनी मांडली मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघ हे संघटन संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रा अनंत लांडगे यांच्या व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली उत्तम काम करत आहे प्राध्यापक अनंत लांडगे हे विद्यार्थी अवस्थेपासूनच चळवळीशी निगडित असल्यामुळे त्यांना प्रश्नाची जाण आहे या बैठकीस पी आर शिंदे, प्रभाकर बनसोडे ,प्रा राम चंदनशिवे ,अरुण भाऊ बनसोडे, अशोक बनसोडे, बाळासाहेब माने ,बलभीम कांबळे सुनील बनसोडे व्ही एस गायकवाड, इत्यादींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही एस गायकवाड यांनी केले कार्यक्रमाचे आभार पी आर शिंदे यांनी मांडले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!