बाभळगावची अनुष्का जमाले विभागीय स्पर्धेत प्रथम : रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुणे) :-
कळंब तालुक्यातील बाभळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी कु. अनुष्का सोमनाथ जमाले हिने लातूर येथे झालेल्या विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धेत उत्तुंग कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. लातूर येथे झालेल्या विभागीय स्तरावरील 80 मीटर अडथळा धावणे स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना अनुष्काने उत्कृष्ट कामगिरी करून रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे. धाराशिव येथे झालेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेतही जि.प.प्रा.शाळा बाभळगावच्या दोन विद्यार्र्थीनींनी तीन क्रिडा प्रकारात कळंब तालुक्याचे प्रतिनिधित्व करत चांगली कामगिरी केली होती.
सामान्य कुटुंबातील अनुष्काच्या विजयामुळे बाभळगांव सह संपूर्ण कळंब तालुक्याचे नाव उंचावली आहे. तिच्या या यशामागे प्रशिक्षक संजय हिंगमिरे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. अनुष्काच्या या कामगीबद्दल सरपंच सुजाता तुषार वाघमारे व गांवकऱ्यांनी अनुष्का, तिचे प्रशिक्षक व मुख्याध्यापक बालाजी टेकाळे यांचे अभिनंदन केले व पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.*ग्रामीण भागात खेळासाठी पुरेशा सुविधा नसताना अनुष्काने दाखवलेले प्राविण्य विशेष उल्लेखनीय आहे. भविष्यात तिच्यापासून प्रेरणा घेत बाभळगाव व कळंब तालुक्यातील अनेक विद्यार्थी विविध क्रीडा प्रकारात राज्यपातळीवर खेळताना दिसावेत यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. – प्रा.तुषार वाघमारे.*


