लोकनेते मा श्री जे. के. (बापू) जाधव (दुधोंडी) अर्बन को -ऑप क्रेडिट सोसा,लि ; रामानंदनगर संस्थेच्या चेअरमन, व्हा चेअरमन यांची बिनविरोध निवड

दर्पण न्यूज रामानंदनगर/ पलूस :-
लोकनेते मा श्री जे. के. (बापू) जाधव (दुधोंडी) अर्बन को -ऑप क्रेडिट सोसा,लि ; रामानंदनगर या संस्थेचे नवनिर्वाचित चेअरमन व व्हा चेअरमन यांची बिनविरोध निवड करण्यात आली.संस्थेचे संस्थापक मा श्री क्रांतिकुमार (आबा ) जाधव यांचा मार्गदर्शना खाली व अध्याशी अधिकारी मा सचिन भि पाटणकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
संस्थेच्या चेअरमन पदासाठी मा. इम्रान (अण्णा) पठाण व व्हा चेअरमन पदी मा विकास (भाऊ) भोसले यांची निवड बिनविरोध करण्यात आली त्यावेळी संस्थेचे नवनिर्वाचित संचालक मा शहाजी (काका) जाधव, मा अनिल (दादा) जाधव, मा हर्षवर्धन (दादा) जाधव, मा महादेव (मामा) पाटील – यादव, मा सुरेश चव्हाण (नाना), मा सिराज पिरजादे(सर), मा अशोक साठे, मा हामिद नराफ संचालिका मा संजीवनी बावधनकर, मा आलका लोखंडे मानसिंग बँकेचे व्हा. चेअरमन मा दौलत लोखंडे (सर), मिनाक्षीदेवी जे. के (बापू) जाधव नॉन ऑग्री को – ऑप क्रेडिट सोसा. लि ; दुधोंडीचे चेअरमन मा मिलिंद (आप्पा ) जाधव, मा राजेंद्र (भाऊ ) नलवडे, मा महेश बावधनकर, मा अंकुश थोराबोले. मा शशिकांत तिरमारे, मा सुजित सुळे, मा रोहित पवार आधी मान्यवर उपस्थित होते.


