भिलवडी, अंकलखोप व दुधोंडी जिल्हा परिषद गटातील आणि पलूस शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक




दर्पण न्यूज भिलवडी पलूस;- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी, अंकलखोप व दुधोंडी जिल्हा परिषद गटातील आणि पलूस शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक कृष्णा-वेरळा मागासवर्गीय सूतगिरणी येथे घेत सर्वांशी विविध विषयावर चर्चा केली तथा मार्गदर्शन केले.
स्थानिक विकासकामे, पक्षाचे संघटनात्मक बळकटीकरण, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि नागरिकांपर्यंत विविध योजना प्रभावीपणे पोहोचविण्याबाबतची यंत्रणा सक्षम करणेबाबत चर्चा झाली. आपल्या भागातील समस्या, गरजा आणि विकासासंबंधी सूचना जाणून घ्या. त्याची सोडवणूक करण्यासाठी पाहिजेल ती मदत करण्यास मी आग्रही आहे.
संघटनात्मक एकजूट, जनसंपर्क वाढविणे आणि समाजातील सर्व घटकांपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचविणे आपल्या सर्वांचे पहिले ध्येय असले पाहिजे. स्थानिक विषयांवर संवाद साधून त्याची कार्यवाही करताना येणाऱ्या अडचणी जिथल्या तिथे सोडवल्या गेल्या पाहिजेत, असेही यावेळी नमूद केले.


