सांगली जिल्ह्यातील ऊस दराबाबत साखर कारखानदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची लवकरच बैठक, जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा


दर्पण न्यूज सांगली/ भिलवडी /पलूस :- सांगली जिल्ह्यातील उस दरा बाबत साखर कारखानदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेची दराबाबत लवकरच बैठक बोलावण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱी अशोक काकडे यांनी दिली आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे
संदीप राजोबा यांनी दिली.यावेळी संदीप राजोबा यांनी सांगितले की,
उसाला प्रतिटन ₹३७५१ दर मागील हंगामातील ₹२०० हप्ता दिल्याशिवाय गळीत हंगाम सुरू सुरू करू नये असे असे”स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा खा राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथे झालेल्या २४व्या ऊस परिषदेत मांडलेल्या भूमिकेचा पाठपुरावा करत ही मागणी करण्यात आली. गेल्या वर्षभरात साखरेचा दर ₹३८०० प्रति क्विंटलपर्यंत गेला असून, इथेनॉल, अल्कोहोल, बगॅस, मोलॅसिसमधून कारखान्यांनी कोट्यवधींचा नफा कमावला आहे. तरीदेखील शेतकऱ्यांना न्याय्य दर न मिळणे ही शेतकऱ्यांच्या मेहनतीचा अपमान आहे, असे संघटनेने ठामपणे नमूद केले.
तसेच २५ किलोमीटरपर्यंतच वाहतूक कपात मर्यादित ठेवावी आणि “२५ किमी क्षेत्रासाठी ₹७५० कपात मान्य, त्यापलीकडील वाहतूक खर्च शेतकऱ्यांवर टाकू नये,” अशी मागणी करण्यात आली.
स्वाभिमानी संघटनेने जिल्ह्यातील सर्व सहकारी व खाजगी साखर कारखान्यांना प्रत्यक्ष भेटून वरील मागण्यांचे निवेदन दिले असून येत्या 10 नोव्हेंबरपर्यंत वरील मागण्या मान्य कराव्या अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रस्त्यावर उतरून आंदोलनाशिवाय पर्याय नाही अशा आशयाचे निवेदन यापूर्वी दिलेले आहे परंतु जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने अद्यापही उसाचा दर जाहीर न करता उसाचे गाळप सुरू केलेले आहे तरी साखर कारखानदार व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यातील ऊस दरामुळे होणारा संघर्ष टाळला जाऊन शेतकऱ्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीप्रमाणे दर द्यावा यासाठी आपण साखर कारखान्याचे चेअरमन व स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस दराबाबत बैठक कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमाणे आपल्या कार्यालयात घेऊन चर्चेतून योग्य तो सन्मान जनक तोडगा काढावा यावी अशी मागणी केली. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेबांनी लवकरात लवकर साखर कारखानदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक आयोजित करतो, असे सांगितले.यावेळी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे पक्षाचे अध्यक्ष महेश खराडे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा बाबा सांद्रे युवा आघाडीचे अध्यक्ष संजय बेले जगन्नाथ भोसले सचिन यादव धन्यकुमार पाटील मनोहर पाटील बाळासो जाधव इम्रान पटेल अशोक पवार भरत चौगुले बाळासो लिंबी काय श्रीधर चौगुले प्रवीण पाटील शहाजी पाटील सर्जेराव पाटील दिनकर पवार दीपक मगदूम समेद पाटील टी के सनगर आदी उपस्थित होते.


