पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांचा 31 रोजी कोल्हापूर जिल्हा दौरा

कोल्हापूर, : अनिल पाटील
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर उद्या कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 09.30 वाजता गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थान येथून गुडाळवाडी ता. राधानगरीकडे प्रयाण.सकाळी 10 वाजता गुडाळवाडी ता. राधानगरी येथे आगमन व संजय मोहिते यांच्या घरी भेट. सकाळी 10.30 वाजता पिरळ रोड लक्ष्मी मंदिर जवळ पाटील गल्ली कसबा तारळे ता. राधानगरी येथे आगमन व रंगश्री कलादालन या डिजीटल फर्मच्या भव्य उदघाटन सोहळ्यास उपस्थिती. सकाळी 11 वाजता सप्तसूर मल्टीपर्पज हॉल कसबा. तारळे ता.राधानगरी येथे आगमन व शौकत बाबालाल बक्ष सरपंच क. तारळे यांचे सुपुत्र रितीक यांच्या विवाह समारंभास उपस्थिती.दुपारी 01.15 वाजता महासैनिक दरबार हॉल सर्किट हाऊस-क. बावडा रोड लाईन बाजार कोल्हापूर येथे आगमन व सुनिल सदाशिव मगदूम, संचालक श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना कागल यांची सुकन्या स्नेहल हिच्या विवाह समारंभास उपस्थिती. दुपारी 2 वाजता शिवसेना जिल्हा कार्यालय खानविलकर पेट्रोल पंप शेजारी, नागाळा पार्क येथे आगमन व शिवसेना पदाधिकारी यांचे समवेत बैठक. दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आगमन व कोल्हापूर महानगरपालिके कडील विविध विषयांच्या आढावा बैठकीस उपस्थिती. सोईनुसार नष्टे लॉन, बसंत बहार रोड, कलेक्टर ऑफीस जवळ, महावीर गार्डन शेजारी, कोल्हापूर येथे आगमन व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई दै. जनप्रवास कोल्हापूर आवृत्ती प्रकाशन सोहळ्यास उपस्थिती. सोईनुसार करंजफेण ता. राधानगरी येथे आगमन व शंकर कांबळे (शंकू) शिवसेना मागासवर्गीय सेल तालुका समन्वयक राधानगरी यांनी आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यास उपस्थिती. सोईनुसार पनोरी ता. राधानगरी येथे आगमन व नंदकिशोर सुर्यवंशी (सरकार) यांचे घरी भेट.
सोईनुसार गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थानी आगमन, राखीव व मुक्काम.


