कोल्हापूर दैवज्ञ बोर्डिंग येथे शंकर महाराज प्रकट दिन सोहळा उत्साहात

कोल्हापूर, अनिल पाटील
जय शंकर परिवार तर्फे दैवज्ञ बोर्डिंग कोल्हापूर येथे आज शंकर महाराज प्रकट दिन सोहळा निमित्त विविध कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचा लाभ हजारो भक्तांनी घेतला आज सकाळी 10 वाजता अभिषेक करण्यात आला महाराष्ट्र राज्य नियोजन महामंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी नितीन कोराणे, निरंजन शिंदे, दैवज्ञ बोर्डींग राजेश क्षिरसागर सुहास लटोरे अजित नरके अजित मोरे उतम कोराणे सुजित चव्हाण, महेश जाधव सागर चव्हाण, आदी प्रमुख मान्यवर व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते जय शंकर परिवाराच्यावतीने नितीन कोराने निरंजन शिंदे यांनी व त्यांच्या सहकार्याने महाप्रसादाचे आयोजन केले होते यावेळी भजन कीर्तन गायन करण्यात आले
अभिषक महाआरती महाप्रसाद यांचा लाभ घेण्यासाठी शंकर महाराज भक्तांनी प्रचंड गर्दी केली होती या कार्यक्रमासाठी महिला भक्तांचीही लक्षणीय उपस्थिती होती सुमारे अडीच हजार हून अधिक भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घेतला यासाठी दैवज्ञ बोर्डिंग व दानशूर व्यक्तीने या धार्मिक सोहळ्यासाठी मोलाचे सहकार्य केले दुपारी चार पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाने शंकर महाराज प्रकट दिन सोहळा संपन्न झाला.


