फसव्या स्कीमला बळी पडू नका ; साहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान पालवे
सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे भिलवडी पोलिस ठाण्यामार्फत सायबर जनजागृती मास ; नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती


दर्पण न्यूज भिलवडी/ पलूस:- आजकाल मोबाईलवर आँनलाईन गेम्स लहान मुले खेळतात, काही गेम्समुळे मुलांच्या मनावर वाईट परिणाम होत असतो, त्यामुळे लहान मुलांना मोबाइल देऊ नका. तसेच फसव्या स्कीमला बळी पडू नका , असे आवाहन भिलवडी पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान पालवे यांनी केले.
सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे भिलवडी पोलिस ठाण्यामार्फत सायबर जनजागृती मासचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी साहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान पालवे बोलत होते.
यावेळी साहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान पालवे यांनी सांगितले की, आपल्या जवळच्या नातेवाईक, कुटुंबातील सदस्यांना सायबर क्राईम विषयी माहिती द्यावी. नोकरी लावतो, घरबसल्या पैसे कमावणे आशा खोट्या जाहिरात येत असतात. ही फक्त सायबर क्राईम फक्त पैसा काढण्यासाठी खोटी माहिती दिली जाते. फेसबुकवर अनोळखी व्यक्तीशी संबंध ठेवू नका. काही लोक मोबाइलद्वारे अश्लील व्हिडिओ दाखवून लैंगिक शोषण करीत असतात, काही लोक याचे बळी पडतात. त्यामुळे न घाबरता पोलिसांशी संपर्क साधावा. कोणत्याही फसव्या स्कीमला बळी पडू नका, असेही साहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान पालवे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला सार्वजनिक वाचनालय भिलवडीचे सचिव कवी सुभाष कवडे, सभासद, वाचनालयचे कर्मचारी, पोलिस कर्मचारी, पत्रकार, वाचक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


