रस्ते कामावरील स्थगिती उठवा, नाहीतर उद्यापासून उपोषण : धाराशिवच्या महिला आक्रमक ; मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना निवेदन

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना निवेदन
दर्पण न्यूज धाराशिव (प्रतिनिधी संतोष खुणे):- धाराशिव शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था आम्हा नागरिकांना दररोजचा त्रास बनली आहे. घराबाहेर पडताना मुलांना शाळेत पाठवताना, बाजारात जाताना, रुग्णांना दवाखान्यात नेताना प्रत्येक पावलागणिक खड्डेच खड्डे.परिणामी अपघात व पाठीचे विकार,असह्य त्रास.आता रस्त्यांची दुरुस्ती सुरू होताच, तीही राजकीय कारणांनी थांबवली.जर तातडीने ती उठवली नाही तर उद्यापासून आम्ही उपोषणाला बसणार असा इशारा धाराशिव शहरातील महिलांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना दिला आहे.
जिल्हाधिकारी यांच्या मार्फत बुधवार 29 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन पाठवून देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,१४० कोटींच्या नगरोत्थान योजनेतून आमच्या रस्त्यांसाठी मंजूर झालेल्या कामांना २८ ऑक्टोबर रोजी सुरुवात झाली, पण त्याच दिवशी स्थगिती ही बाब अतिशय अन्यायकारक असून जनतेच्या जीविताशी व आरोग्याशी खेळणाऱ्याना आम्ही आता गप्प बसणार नाही.
जर रस्त्यांवरील स्थगिती तात्काळ उठवली नाही,जर नागरिकांच्या हालअपेष्टांकडे दुर्लक्ष होत राहिलं,तर शहरातील महिला वर्गच रस्त्यावर उतरेल!उपोषण, आंदोलन, निदर्शने सर्व काही करण्यास आम्ही तयार आहोत.आता आमच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे.धाराशिवच्या विकासाला अडथळा आणणाऱ्यांना महिला वर्ग उत्तर देईल ते ही रस्त्यावरूनच असा ईशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर धाराशिव शहरातील महिला सुजाता पवार,सुषमा पवार, अनसूया माने,राजकन्या पवार , कमल चव्हाण ,वंदना डोके, शर्मिला सलगर ,विद्या इंगळे, छाया लाटे, शिवानी परदेशी, वर्षा नळे , सुनिता वाघचौरे, रंजना गुरव, भाग्यश्री इंगळे, रुक्मिणी मंजुळे, वैशाली सोनवणे, रूपाली गाटे, कोमल पवार, कविता भुले, हिना शेख, महादेवी तानवडे, कोमल काकडे, नेहा काकडे, नागर गुंडरे , सुनंदा काकडे यांच्या सह आदी महिलांच्या सह्या आहेत.


