साहित्यिक कवी सुभाष कवडे यांच्या हिरवी हिरवी झाडे बालकविता संग्रहाच्या ऑडिओ बुक चे प्रकाशन

दर्पण न्यूज भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील साहित्यिक कवी सुभाष कवडे यांच्या हिरवी हिरवी झाडे या बालकविता संग्रहाच्या ऑडिओ बुक चा प्रकाशन समारंभ भिलवडी वाचनालयाच्या सभागृहात नुकताच उत्साही वातावरणात संपन्न झाला पुणे येथील साधना विद्यालय हडपसर या विद्यालयातील इयत्ता सहावीतील विद्यार्थी कुमार श्रुतेश दीपक पाटील याने वाचलेल्या बालकवितांचे हे ऑडिओ बुक श्रुतेश यांनी तयार केलेले आहे प्रकाशन समारंभ साने गुरुजी संस्कार केंद्रातील बालवाचकांच्या हस्ते संपन्न झाला प्रारंभीन संस्कार केंद्राचे केंद्रप्रमुख व बालकविता संग्रहाचे कवी सुभाष कवडे यांनी सर्वांचे स्वागत करून श्रुती व त्याच्या आईस पुस्तके भेट देऊन त्यांचे स्वागत केले यानंतर संस्कार केंद्रातील विद्यार्थी अनन्या घोडके वेदश्री निकम अमेय नलवडे या विद्यार्थ्यांच्या हस्ते स्कॅनरचे प्रकाशन करून कवितासंग्रहातील कविता उपस्थिततांना ऐकविण्यात आल्या. समारंभास वाचनालयाचे उपाध्यक्ष डी आर कदम ग्रंथपाल मयुरी नलवडे मुख्य लेखणीक विद्या निकम बाळासाहेब माने सर संजय चौगुले प्रथमेश वावरे श्रुतेश यांची आई समता चौगुले यांच्यासह विद्यार्थी व वाचक उपस्थित होते या सर्वांनी हिरवी हिरवी झाडे या बालकविता संग्रहातील त्यांना आवडणाऱ्या बालकवितांचे प्रभावी सादरीकरण केले. यावेळी श्रुतेश पाटील याने सुंदर बासरी वादन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले उत्तम भोई यांनी मनोगत व्यक्त करून संस्कार केंद्राचे वतीने श्रुतेश यास भेटवस्तू प्रदान केली सर्व उपस्थितांचे आभार मेजर उत्तम भोई यांनी मानले यापूर्वी सुभाष कवडे यांच्या जांभळमाया आणि संस्कार शिदोरी या पुस्तकांचेही ऑडीओ बुक तयार केलेले आहे. हिरवी हिरवी झाडे या बालकविता संग्रहाचे ऑडीओ बुक झाल्यामुळे हा बालकविता संग्रह आता जगभरातील मराठी साहित्य प्रेमींना व काव्यप्रेमींना ऐकता येणार आहे. यासाठी श्रुतेश व त्याची आई समता चौगुले यांनी परिश्रम घेतलेले आहेत. प्रारंभी साने गुरुजींच्या प्रतिमेस विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच खरा तो एकची धर्म ही प्रार्थना सादर करण्यात आली या ऑडीओ बुकमुळे आता हिरवी हिरवी झाडे हे पुस्तक ऐकण्याचा आनंद सर्व रसिकांना मिळणार आहे.याबद्दल वाचनालय आणि संस्कार केंद्राचे वतीने श्रुतेश पाटील. या विद्यार्थ्यांचा ग्रंथ भेट आणि भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला. मराठी माध्यमाच्या सर्व शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनाही हिरवी हिरवी झाडे या सुंदर बालकवितांचा आनंद घेता येणार आहे.


