संवेदनशील आणि भावनिक आपुलकी जपणारा नेता : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर ; ज्यूनिअर रजनीकांत ऊर्फ बसवराज पाटील



काल बुधवारी आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा निरोप आल्यानंतर आम्ही टेलर वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी आणि मी स्वतः लगबगीने गारगोटी या गावी गेलो. दुपारी चार वाजता त्या ठिकाणी पोचल्यानंतर पालकमंत्री माननीय आबिटकर साहेब यांनी आमच्या सर्व टेलर बांधवांचा सन्मान केला . दिवाळीचं अवचित असल्यामुळे आम्ही माननीय पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या व आशीर्वाद घेतला. नेहमीच कोणतेही काम असले तर संवेदनशील भावनेने त्या कामाचा निपटारा करण्याचे आत्मीयतेने प्रयत्न करणारे आबिटकर साहेब यांना आम्ही कदापि विसरणार नाही. आम्ही आमच्या टेलर वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून केलेल्या टेलर व्यवसायिक महामंडळाचा प्रस्ताव त्यांनी कशा पद्धतीने निपटारा करतो आहे याची कथन केले आणि आम्हा सर्वांना आश्वस्त केले. यामुळे आम्ही सर्व टेलर व्यावसायिक बांधव यांनी एक आशावाद व्यक्त केला. हे करत असताना माननीय आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर साहेब यांनी नुसतेच आम्ही आमच्या कामाला आलोय या भावनेने न पाहता आपुलकीने आणि आत्मीयतेने आमची विचारपूस केली. हि भावना ते नेहमी करत आले आहेत. मंत्री साहेबांशी अतिशय जवळीक आम्ही आलो आहे. याचं कारण म्हणजे निस्वार्थ मैत्री जमली.
माणूस माणसाला कसे सहकार्य करतो, सामान्य माणसासह आपलेसे करून उच्च पदावर गेल्यानंतरचा अभिमान बाजूला ठेवून आम्हा टेलर व्यवसायिकांना मोठ्या संकटातून सावरण्याचा प्रयत्न ते आज तागायत करत आहेत, ते आम्हाला या भेटीदरम्यान दिसले. नक्कीच अशा माणसाशी टेलर वेल्फेअर असोसिएशन साथ देईल. तसेच प्रत्येक कामात संवेदनशीलता, आपुलकी , आत्मियता कशी जोपासावी , माणसाला माणूसपण , माणसाने माणसाशी कसे जगावे हे आम्ही काल गारगोटी येथे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना भेटल्यानंतर् पाहिले. आम्हा टेलर व्यवसायिकांना नेहमीच हातभार लावणारे आणि राज्यातील गोरगरीब टेलर व्यवसाय िकांचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवणारे मंत्री आबिटकर साहेब यांचे आम्ही शतशः आभार आहे.
==: टेलर वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बसवराज पाटील उर्फ ज्युनिअर रजनीकांत, सांगली.


