शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतमालाची निर्यात आवश्यक : जे के (बापू) जाधव
सांगली येथील महालक्ष्मी एक्स्पोर्ट कंपनीच्या मार्फत सौदी अरेबिया दुबई सह अनेक प्रदेशांत केळी निर्यात करण्याचा शुभारंभ





दर्पण न्यूज पलूस /दुधोंडी — :
आपल्या परिसरात पारंपरिक पद्धतीने काही शेती करतात आपणास पाहावयास मिळते आहे. पण, शेतकऱ्यांनी आपले जीवनमान उंचावण्यासाठी शेतमालाची निर्यात करणे आवश्यक आहे , असे कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते जे के (बापू) जाधव यांनी सांगितले.
सांगली येथील महालक्ष्मी एक्स्पोर्ट कंपनीच्या मार्फत सौदी अरेबिया दुबई सह अनेक प्रदेशांत केळी निर्यात करण्याचा शुभारंभ टेंभुर्णी जि सोलापूर येथे कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते जेके बापू जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जे के बापू जाधव यांनी सांगितले.महालक्ष्मी एक्स्पोर्टचे संचालक धनाजी शेंडगे, कुंडलचे पवन धस आणि इचलकरंजीचे निरंजन डाके यांनी अनेक दिवस सोलापूर परिसरात शेतीमालाचा अभ्यास करून त्या परिसरात मोठ्या प्रमाणात लागवड होत असलेली केळी हे फळ निर्यातीसाठी निवडले. तेथील अनेक कोल्ड स्टोरेज या केळीवर शीतप्रक्रिया करून शीत प्रक्रियेची सुविधा असलेल्या कंटेनर मधून ही केळी रॉयल बनाना या ब्रँडखाली रवाना करण्यात आली. यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला भाव मिळणार आहे. केळी रवाना होत असलेल्या कंटेनर चे पूजन दुधोंडी येथील कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक जे के (बापू) जाधव यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी धनाजी शेंडगे निरंजन डाके,पवन धस व इतर मान्यवर, अनेक केळी उत्पादक शेतकरी, स्टोरेजचे संचालक उपस्थित होते.


