सार्वजनिक वाचनालय भिलवडी

🌼सार्वजनिक वाचनालय भिलवडी🌼
यांचे वतीने आज दीपावलीच्या पहिल्याच दिवशी भव्य दिवाळी अंक प्रदर्शन संपन्न झाले. या दिवाळी अंक प्रदर्शनात शंभराहून अधिक अंक मांडण्यात आले होते.याच्यामध्ये साहित्य क्रीडा शेती शिक्षण पाककला विनोदी बाल वांड्मय असे अनेक विषयांचे अंक मांडण्यात आले होते या प्रदर्शनाचा लाभ भिलवडी आणि परिसरातील शंभरहून अधिक वाचकांनी घेतला प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी वाचनालयाने शंभर रुपयात 100 दिवाळी अंक वाचा हा उपक्रम सुरू केलेला आहे.उपक्रमाचे 25 वे वर्ष आहे स्वर्गीय काकासाहेब चितळे यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम सुरू करण्यात आलेला होता या प्रदर्शनाचे उद्घाटक म्हणून चितळे उद्योग समूहाचे गिरीश चितळे भिलवडीचे सुपुत्र आय. ए.एस.अधिकारी माननीय प्रकाश मगदूम आय.ए.एस.अधिकारी सौभाग्यवती विना मगदूम यांचे हस्ते प्रदर्शनाचे ग्रंथ पूजन करून उद्घाटन करण्यात आले विद्या निकम यांनी स्वागत केले तर वाचनालयाचे कार्यवाह सुभाष कवडे यांनी प्रास्ताविक करून उपक्रमाचा हेतू विशद केला विविध विषयांवरच्या शंभरहून अधिक दिवाळी अंकांचा लाभ घेण्याचे भिलवडीकरांना आवाहन केले यावेळी गिरीश चितळे प्रकाश मगदूम विना मगदूम यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले मयुरी नलवडे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले यावेळी सुभाष कवडे यांनी किस्त्रीम दिवाळी अंकातील त्यांची प्रसिद्ध झालेली कविता सादर केली. प्रदर्शनास वाचनालयाचे उपाध्यक्ष डी आर कदम विश्वस्त जी. जी. पाटील संचालक जयंत केळकर बाळासाहेब पाटील महादेव जोशी सभासद वाचक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज पासून सभासदांना दिवाळी अंक वितरित करण्याचाही शुभारंभ झाला.


